**बार्शी तालुक्यात मोटारसायकल अपघातात एका तरुणाचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल**
**बार्शी तालुक्यात मोटारसायकल अपघातात एका तरुणाचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल**
सोलापूर, १६ सप्टेंबर : बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे येथे झालेल्या मोटारसायकल अपघातात एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात प्रथम खबर नोंदणी क्रमांक ३०६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २८१, १०६(१), ३२४(४)(५) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना ८ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे २ वाजता खांडवी ते उपळाई ठोंगे जाणाऱ्या रस्त्यावर लक्ष्मीआईच्या छोट्या मंदिराजवळ घडली. उपळाई ठोंगे येथील अनिल मधुकर ढेरे (वय ३६) यांनी आपली होंडा शाईन मोटारसायकल (क्रमांक एमएच-१३-एफई-५६९९) चालवत असताना पाठीमागे सुनिल पाडुरंग जाधव (वय ३०, रा. उपळाई ठोंगे) बसले होते. दोघे खांडवीहून उपळाई ठोंगेकडे जात असताना चालकाने रस्त्याची परिस्थिती न पाहता हायस्पीड, अविचाराने आणि निष्काळजीपणे वाहन चालवले. समोर अचानक कुत्रा आडवा आल्याने ब्रेक लावताना मोटारसायकल स्लीप होऊन दोघेही पडले.
अपघातात पाठीमागे बसलेल्या सुनिल जाधव यांच्या पोटास गंभीर इजा झाली. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना १० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.१६ वाजता त्यांचा मृत्यू झाला. मोटारसायकलचे सुमारे दोन हजार रुपयांचे नुकसान झाले.
बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय श्रीपती भालेराव यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली. घटनास्थळाची पाहणी आणि तपासानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला. प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी अधिकारी सोनवणे यांच्या आदेशाने श्रेणी पोसई भालेराव यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तपास सुरू आहे.
टिप्पण्या