*बार्शीत विनयभंगाच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता; सबळ पुराव्याअभावी न्यायालयाचा निर्णय*
*बार्शीत विनयभंगाच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता; सबळ पुराव्याअभावी न्यायालयाचा निर्णय*
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, * बार्शी शहर पोलीस ठाणे येथील गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४१/२०१९ अंतर्गत भादंवि कलम ३५४, ३५४-अ व ३५४-ड अन्वये दाखल झालेल्या प्रकरणात आरोपी सुरज मोहन कांबळे (रा. सिद्धार्थ नगर, बार्शी) याची बार्शी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मा. न्यायाधीश श्रीमती पी. व्ही. राऊत यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.
आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपीच्या वतीने अॅड. विवेक गजशिव यांनी बाजू मांडली. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले. तथापि, या साक्षीदारांचा पुरावा आरोपीस शिक्षा देण्याइतका पुरेसा नसल्याचे तसेच आरोपीविरुद्ध सबळ पुराव्याचा अभाव असल्याचे अॅड. गजशिव यांनी युक्तिवादात नमूद केले.
न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीची सदर आरोपातून निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. विवेक गजशिव यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या