*सासू-सासऱ्यांच्या घराचा ताबा कायम; सर्वोच्च न्यायालयाने सुनेची याचिका फेटाळली*

*सासू-सासऱ्यांच्या घराचा ताबा कायम; सर्वोच्च न्यायालयाने सुनेची याचिका फेटाळली* 

*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, २३ सप्टेंबर : बार्शी येथील ज्येष्ठ नागरिक दांपत्य लता अनिल शिंदे व अनिल गुरुनाथ शिंदे यांच्या स्वकष्टार्जित घरजागेचा ताबा त्यांना देण्याबाबतचा आदेश आता सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला आहे. सन वैशाली शिंदे यांनी दाखल केलेली विशेष अनुमती याचिका फेटाळण्यात आली.

गट क्रमांक १३४०/२/अ पैकी प्लॉट क्रमांक ३० वरील टू-बीएचके घराबाबत हा वाद होता. पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम, २००७ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांनी उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) सदाशिव पडदुणे यांच्याकडे अर्ज केला होता. न्यायिक चौकशीअंती २८ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रांत अधिकाऱ्यांनी ज्येष्ठ दांपत्याला घराचा ताबा देण्याचे आदेश दिले.

या आदेशाविरोधात सुनेने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे अपील केले. जिल्हाधिकाऱ्यांनी अपील फेटाळून प्रांत अधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली. २२ जुलै २०२६ रोजी उच्च न्यायालयानेही याचिका फेटाळताना ज्येष्ठ नागरिकांच्या जीवन व मालमत्तेच्या संरक्षणाचा विचार करून आदेश कायम ठेवला.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वैशाली सचिन शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लीव्ह पेटिशन क्रमांक ३२२२९/२०२६ दाखल केली. १६ सप्टेंबर २०२६ रोजी न्यायमूर्ती एस. व्ही. एन. भट्टी व न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निष्कर्षांची नोंद घेत याचिका स्वीकारण्यास नकार दिला व फेटाळून लावली.

या प्रकरणात ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने अॅड. विवेक गजशिव, अॅड. शरद टी. भोसले व अॅड. आनंद दिलीप पाटील यांनी काम पाहिले. ज्येष्ठ नागरिकांच्या मालमत्ता व जीवनाच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**