*हद्दपार आरोपी बार्शीत घुसल्याने गुन्हा दाखल; कलम १४२ अन्वये कारवाई*

*हद्दपार आरोपी बार्शीत घुसल्याने गुन्हा दाखल; कलम १४२ अन्वये कारवाई* 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : हद्दपार आदेशाचे उल्लंघन करत बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीत प्रवेश केल्याप्रकरणी इब्राहीम राजहमद शेख याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बार्शी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६७०/२०२६ दाखल झाला.

घटना १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.१४ वाजता ग्रामीण रुग्णालय, बार्शी येथे घडली. हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आरोपीने सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीत प्रवेश केला. गुन्हा ३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.२६ वाजता नोंदविण्यात आला. घटनास्थळ ठाण्यापासून दक्षिणेस सुमारे ३ किलोमीटर अंतरावर आहे.

फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल १५३ सचिन सोमनाथ राऊत (बार्शी शहर पोलीस ठाणे) यांनी सरकारतर्फे तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा नोंदवून स्टेशन डायरी रिपोर्ट संबंधित न्यायालयात पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार कॉन्स्टेबल ६४९ कोतवाल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

आरोपी इब्राहीम राजहमद शेख (रा. मंगळवार पेठ, बार्शी) याला यापूर्वी फेब्रुवारी २०२६ मध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी मोहसिन साबीर तांबोळी यांच्या टोळीतील इतर सदस्यांसह एक वर्षासाठी हद्दपार केले होते. हद्दपार आदेशाचे उल्लंघन हा गंभीर गुन्हा असल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई केली आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**