*पोलिसांची मोठी कारवाई : कुर्डूवाडीत ७१ किलो गांजाची झाडे जप्त; एकावर गुन्हा दाखल*
*पोलिसांची मोठी कारवाई : कुर्डूवाडीत ७१ किलो गांजाची झाडे जप्त; एकावर गुन्हा दाखल*
KDM NEWS प्रतिनिधी कुर्डूवाडी* कुर्डूवाडी पोलीस ठाणे (सोलापूर ग्रामीण) पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मौजे उजणी (मा) ता. माढा परिसरात छापा टाकून एकूण ७१ किलो १९ ग्रॅम वजनाची गांजाची हिरवी झाडे जप्त केली. जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत ₹३५,५९,५०० आहे.
या प्रकरणी अभिमान विठ्ठल लोकरे (वय ५३, रा. उजणी यांच्याविरुद्ध कुर्डूवाडी पोलीस ठाणे गु.र. क्र. ४०२/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ कलम ८(सी), २०(अ)(ii)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई/पवार, कुर्डूवाडी पोलीस ठाणे हे करीत आहेत.
छाप्यादरम्यान संशयितांच्या शेतात गांजाची झाडे लागवड केल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने थेट शेतात जाऊन तपासणी केली. तेथे गांजाची झाडे लागवड केल्याचे आढळून आल्याने ती जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा (व्हि.एस., करमाळा उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कारवाईत सहभागी असलेले अधिकारी – पोलीस निरीक्षक अतुल मोहिते (प्रभारी अधिकारी, कुर्डूवाडी), सपोनि/गटकुळ, पोसई/पवार, सपोफै/रणदिवे, पोहेकॉ/ शिंदे, पोहेकॉ/ हराळे, पोहेकॉ/ मोरे, पोकॉ/ मुलाणी, पोकॉ/ बागल, पोकॉ/ कुंभार आणि चापोकॉ/२६ गात.
पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांनी सांगितले की, अमली पदार्थांविरोधातील कारवाई प्रभावीपणे सुरू राहील आणि बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या