**पंढरपूर : वृद्ध प्रेमप्रकरणातून हत्या, दीड महिन्यानंतर डीएनए अहवालाने उघडला खून**
*पंढरपूर : वृद्ध प्रेमप्रकरणातून हत्या, दीड महिन्यानंतर डीएनए अहवालाने उघडला खून*
*KDM NEWS प्रतिनिधी पंढरपूर*सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात दोन वृद्धांच्या प्रेमप्रकरणातून झालेल्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ७० वर्षीय अंबादास खांडेकर यांची त्यांच्या प्रेयसी मंगल होनमाने (७०) यांनी हत्या केल्याचा आरोप आहे. मंगलला पोलिसांनी अटक केली असून तिने गुन्हा कबूल केला आहे.
अंबादास आणि मंगल यांच्यातील प्रेमसंबंध गेल्या काही वर्षांपासून चालू होते. दोघे गावात नियमित भेटत असत. २७ जुलै रोजी दोघांमध्ये किरकोळ वादातून जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात मंगलने अंबादासवर हल्ला करून शेतातच त्यांची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह अर्धवट जाळून टाकला आणि पळून गेली.
२ ऑगस्ट रोजी गावकऱ्यांना शेतात अर्धवट जळालेला मृतदेह दिसला. पोलिसांना माहिती मिळताच फॉरेन्सिक टीम बोलावण्यात आली. मृतदेह पूर्ण जळाल्याने ओळख पटणे अवघड होते. नमुन्यांची डीएनए तपासणी करण्यात आली. दीड महिन्यानंतर अंबादास यांच्या दोन मुलींच्या डीएनए अहवालातून मृतदेह त्यांचा असल्याची पुष्टी झाली.
ओळख पटल्यानंतर अवघ्या बारा तासांत पोलिसांनी मंगलला अटक केली. चौकशीत तिने प्रेमप्रकरण आणि भांडणातून हत्या केल्याचे कबूल केले. भांडणाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
ही घटना जिल्ह्यात चर्चा घडवत आहे. उतरत्या वयातील प्रेमसंबंधांचा रक्तरंजित शेवट झाल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या