*मान्सूनची माघार शनिवारपासून सुरू; महाराष्ट्रात २५ ते २८ सप्टेंबरदरम्यान पाऊस निरोप घेण्याची शक्यता*
*मान्सूनची माघार शनिवारपासून सुरू; महाराष्ट्रात २५ ते २८ सप्टेंबरदरम्यान पाऊस निरोप घेण्याची शक्यता*
KDM NEWS प्रतिनिधी दिल्ली/मुंबई : नैऋत्य मान्सूनची माघार शनिवार (१९ सप्टेंबर) पासून पश्चिम राजस्थानातून सुरू होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली आहे. सर्वसाधारण तारीख १७ सप्टेंबर असली तरी यंदा दोन दिवस उशिरा माघार सुरू होईल.
देशभरात १ जून ते १४ सप्टेंबर दरम्यान १५ टक्के पावसाची तूट आहे. महाराष्ट्रात ही तूट १६ टक्के आहे. मराठवाड्यात ३६ टक्के तर विदर्भात २७ टक्के तूट नोंदवली गेली आहे. बीड, धाराशिव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत ४० टक्क्यांहून अधिक तूट आहे. २० जिल्ह्यांतील ८६ तालुक्यांत ३० दिवसांहून अधिक पावसाचा खंड पडला आहे.
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार २५ ते २८ सप्टेंबरदरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. माघार सुरू झाली तरी काही भागांत हलका ते मध्यम पाऊस सुरू राहू शकतो. पुढील काही दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता आहे. कमाल तापमानात ३ ते ५ अंशांची वाढ होईल.
एल निनोचा प्रभाव आणि असमान पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ ऑक्टोबरपासून दुष्काळी स्थितीचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या