*पोलिसांना मोलाचे सहकार्य; बार्शीत 'पोलीस जाणीव सेवा संघ'च्या सदस्यांचा गौरव*
*पोलिसांना मोलाचे सहकार्य; बार्शीत 'पोलीस जाणीव सेवा संघ'च्या सदस्यांचा गौरव*
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी*बार्शी शहर पोलीस ठाणे येथे पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य (बार्शी शहर) यांच्या सदस्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. गणेश कुंभारे आणि बार्शी विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुहास जगताप यांच्या हस्ते हा सत्कार झाला. संघाच्या सदस्यांनी पोलीस बांधवांसोबत मिळून विविध वेळी बंदोबस्त केला व सतत सहकार्य केले, या कामगिरीबद्दल त्यांना प्रशस्तीपत्रे देण्यात आली.
सत्कारित सदस्य : श्री. रमेश कानडे, श्री. माळी सर, प्रशांत मेंढापुरे, मनोज लिंगे, नष्टे सर, धारूरकर, होनराव, श्रीकांत मैड, दत्ता कावडे, अनिकेत फावडे आणि अजय जाधव.
अधिकाऱ्यांनी संघाच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या