*बार्शी : वायंडिंग वर्कशॉपमधील कॉपर वायर चोरीचा पर्दाफाश; तीन आरोपी अटकेत, ६.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त*

*बार्शी : वायंडिंग वर्कशॉपमधील कॉपर वायर चोरीचा पर्दाफाश; तीन आरोपी अटकेत, ६.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त*


*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी*बार्शी शहर पोलिसांनी परांडा चौक परिसरातील एका वायंडिंग वर्कशॉपच्या गोदामातून झालेल्या कॉपर वायर चोरीप्रकरणात आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, चोरीस गेलेली कॉपर वायर, गुन्ह्यात वापरलेले वाहन व इतर साहित्य असा एकूण सुमारे ६ लाख ९७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दि. १२ ते १३ जून २०२६ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून २०४ किलो वजनाची पाच बंडले कॉपर वायर (किंमत १ लाख ९३ हजार ६०० रुपये) चोरून नेली होती. तक्रारदार पप्पू श्रीमंत रगडे यांच्या फिर्यादीवरून बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे कोल्हापूर परिसरातील संशयितांचा माग काढण्यात आला. त्यानंतर सागर आकाराम गोसावी (४१, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर, जि. कोल्हापूर), हणमंत राजाराम सपोनेसी (४०, रा. त्रिवोळी मंदिर, तेवलाई नाका, कोल्हापूर) आणि दुर्गाप्पा रामाप्पा कल्याणी (४८, रा. त्रिवोळी मंदिर, तेवलाई नाका, कोल्हापूर) यांना अटक करण्यात आली. चौथा साथीदार मंजुनाथ (रा. तेवलाई नाका, कोल्हापूर) फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

आरोपींकडून २०४ किलो कॉपर वायर, सुमारे ५ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप (क्र. एमएच १० बीआर १४११), वायर कापण्याचे कटर व इतर साहित्य (अंदाजे ४ हजार रुपये) जप्त झाले. आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर फरार आरोपीचा शोध व टोळीच्या इतर संभाव्य गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आंतरजिल्हा किंवा आंतरराज्य गुन्हेगारीशी संबंध आहे का, याबाबतही तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली झाली.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**