*निवडणूक बैठक संपवून परतत असताना बार्शीच्या तहसीलदारांचा मानवतावादी दृष्टीकोन; अपघातग्रस्ताला दिले जीवदान!*

*निवडणूक बैठक संपवून परतत असताना बार्शीच्या तहसीलदारांचा मानवतावादी दृष्टीकोन; अपघातग्रस्ताला दिले जीवदान!* 

*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, ४ सप्टेंबर : सोलापूरहून निवडणूक संबंधित बैठक आटोपून परत येत असताना मा. तहसिलदार फ. आर. शेख आणि मा. नायब तहसिलदार सानप यांनी बार्शी-सोलापूर रस्त्यावर पानगावजवळ अपघातग्रस्त व्यक्तीला तातडीची मदत केली.

रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व्यक्तीकडे काही लोक जमा झाले होते. तहसिलदार साहेबांनी गाडी थांबवून स्वतः जवळ जाऊन परिस्थिती तपासली. व्यक्ती जिवंत होता, पण डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याने तो झोपून पडला होता.

तहसिलदारांनी लगेच बार्शी तालुका आरोग्य प्रशासनाशी संपर्क साधून ॲम्बुलन्स पाठवण्याबाबत सूचना दिल्या. वैराग आरोग्य केंद्रालाही तात्काळ ॲम्बुलन्स पाठवण्याचे आदेश दिले. नायब तहसिलदार सानप आपत्कालीन विभागाशी सातत्याने संपर्क ठेवत होते. उशीर पाहून अपघातग्रस्ताला स्वतःच्या ऑफिसच्या गाडीत घेऊन जाण्याचा आग्रह त्यांनी केला.

तत्काळ बार्शी आणि वैरागहून ॲम्बुलन्स घटनास्थळी पोहोचल्या. जखमीला ॲम्बुलन्समधून बार्शी येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. तहसिलदार साहेब उपस्थित लोकांशी थोडी चर्चा करून बार्शीकडे निघाले.

अपघातग्रस्ताला संकटसमयी तातडीने मदत करणे हीच खरी मानवता असल्याचे या घटनेतून दिसून आले. तहसिलदार शेख आणि नायब तहसिलदार सानप यांनी दाखवलेले सहृदयी मन प्रशंसनीय आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**