*महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सदस्यपदी सतीश वाघोले नियुक्त; अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली शपथ*

*महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सदस्यपदी सतीश वाघोले नियुक्त; अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली शपथ* 

*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी मुंबई :** महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सदस्यपदी नव्याने नियुक्त झालेल्या सतीश बबन वाघोले यांना आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या २ सप्टेंबर २०२६ रोजीच्या अधिसूचनेनुसार भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३१६ मधील खंड (१) अन्वये राज्यपालांनी सतीश बबन वाघोले यांची सदस्यपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर आयोगाच्या मुख्यालयात झालेल्या शपथविधी सोहळ्यात अध्यक्ष भीमनवार यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

यावेळी आयोगातील सदस्य तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या नियुक्तीमुळे आयोगातील सदस्यांची संख्या वाढली असून परीक्षा, मुलाखती व शिफारस प्रक्रिया अधिक गतिमान होण्याची अपेक्षा आहे.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**