*एसटीच्या NCMC कार्डसाठी मोठे बदल; अमृत ज्येष्ठांना आधार OTPची सुविधा*
*एसटीच्या NCMC कार्डसाठी मोठे बदल; अमृत ज्येष्ठांना आधार OTPची सुविधा*
*KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, १८ सप्टेंबर :** महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) NCMC कार्ड प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारक प्रवाशांसाठी नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू आहे. प्रवाशांना सवलतीचा लाभ अधिक सुलभपणे मिळावा यासाठी महामंडळाने महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत.
ज्या अमृत ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे बायोमेट्रिकमध्ये जुळत नाहीत, अशा लाभार्थ्यांसाठी २१ सप्टेंबर २०२६ पासून आधार कार्डशी जोडलेल्या मोबाइल नंबरवर येणाऱ्या OTPद्वारे नोंदणी करता येणार आहे. यामुळे वयोवृद्ध प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
२१ सप्टेंबरपासून हरवलेले किंवा चोरीला गेलेले NCMC कार्ड ब्लॉक करून १९९ रुपये शुल्क भरून नवीन कार्ड मिळवता येईल.
१९ सप्टेंबरपर्यंत नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना २५ सप्टेंबरपासून कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. १६ सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्यांना QR कोड असलेली पावती दिली जात आहे. ही पावती ETIM मशीनवर स्कॅन करून सवलतीचे तिकीट मिळेल आणि ती ३० दिवस वैध राहील. नोंदणीनंतर ३० दिवसांत कार्ड सक्रिय करून त्यात टॉप-अप करणे आवश्यक आहे.
सवलतीचा लाभ अखंडित राखण्यासाठी सर्व संबंधित लाभार्थ्यांनी जवळच्या एसटी आगार, नियंत्रण कक्ष किंवा अधिकृत केंद्रांवर तात्काळ नोंदणी पूर्ण करावी, असे महामंडळाने आवाहन केले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या