*सौंदरे मारहाण प्रकरण: आरोपींवर 'बीएनएस १०९' ची कलमवाढ; जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल*
*सौंदरे मारहाण प्रकरण: आरोपींवर 'बीएनएस १०९' ची कलमवाढ; जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल*
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, ता. २ : बार्शी तालुक्यातील सौंदरे येथील किरण दौलत मोरे (वय २७) यांच्यावर झालेल्या गंभीर सामूहिक मारहाण प्रकरणात अॅड. विवेक गजशिव यांच्या सातत्यपूर्ण कायदेशीर पाठपुराव्याने आरोपींवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९ (जुने आयपीसी कलम ३०७) अंतर्गत कलमवाढ करण्यात आली आहे.
दि. ४ जुलै २०२६ रोजी रात्री ११.३० वाजता सौंदरे येथे पाच आरोपींनी लोखंडी कोयता, सेट्रिंगच्या लाकडी पट्या, काठी व दगडांनी किरण मोरे यांच्यावर हल्ला केला. यात डोक्याला गंभीर दुखापत व पायाला मोठे फ्रॅक्चर झाले. वैद्यकीय कागदपत्रांनुसार जखमीला कायमचे अपंगत्व आले आहे.
सुरुवातीला बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २१५/२०२६ अंतर्गत बीएनएस कलम ११८(१), ११८(२), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ३२४(४), ३५१(२) व ३५२ अन्वये मूळ फिर्यादी सुनीता दौलत मोरे (वय ४६) यांनी गुन्हा दाखल केला होता.
आरोपींच्या जामीन अर्जाच्या वेळी अॅड. गजशिव यांनी जखमीची आई यांच्यावतीने वकीलपत्र दाखल करून प्राणघातक हल्ल्याचे पुरावे सादर केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, बार्शी यांनी जामीन नामंजूर केला.
त्यानंतर सोलापूर पोलीस अधीक्षक, बार्शी पोलीस उपविभागीय अधिकारी व तालुका पोलीस ठाणे येथे लेखी अर्ज करून वैद्यकीय अहवाल व अन्य कागदपत्रे जोडून कलमवाढीची मागणी करण्यात आली. प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या सूचनेनुसार नव्याने तपास करण्यात आला. एनसीसीटी हेड रिपोर्ट, ग्रामीण रुग्णालय व डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटलचे फ्रॅक्चर रिपोर्ट तसेच पुरवणी जबाब घेऊन न्यायालयीन कलमवाढ रिपोर्ट सादर करण्यात आला.
या पाठपुराव्याने प्रकरणाचे स्वरूप जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने केलेल्या प्राणघातक हल्ल्याचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या