*गातेगाव पोलिसांची तत्पर कारवाई : आठ दिवसांत चोरीस गेलेली म्हैस शेतकऱ्याला परत*
*गातेगाव पोलिसांची तत्पर कारवाई : आठ दिवसांत चोरीस गेलेली म्हैस शेतकऱ्याला परत*
KDM NEWS प्रतिनिधी गातेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे तांदुळवाडी येथील शेतकऱ्याची सुमारे ९० हजार रुपये किमतीची म्हैस चोरीस गेल्यानंतर अवघ्या आठ दिवसांत शोधून काढण्यात येऊन मूळ मालकाला सुरक्षितपणे परत करण्यात आली आहे. पोलिसांच्या या प्रभावी कारवाईमुळे शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला.
दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री तांदुळवाडी येथील शेतकरी अनिल गोविंद गाडे यांची म्हैस चोरीस गेल्याची तक्रार गातेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्यानुसार गुन्हा नोंद क्रमांक १७३/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गढवे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक माहिती, गोपनीय सूत्रे आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कसोशीने तपास केला. अथक प्रयत्नांनंतर अवघ्या आठ दिवसांत म्हैस शोधून काढण्यात यश आले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुमारे ९० हजार रुपये किमतीची ही म्हैस फिर्यादी अनिल गोविंद गाडे यांच्या ताब्यात सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आली.
ही कारवाई API गढवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार केंद्रे, लखनगिरे व गिरी यांच्या पथकाने पार पाडली. पोलिसांच्या तत्परतेमुळे शेतकऱ्याला आर्थिक व भावनिक नुकसान टाळता आले असून गातेगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेचे हे उत्तम उदाहरण आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या