*बार्शी : वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळाची तातडीने अंमलबजावणी करा*

*बार्शी : वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळाची तातडीने अंमलबजावणी करा* 

KDM NEWS प्रतिनिधी बार्शी ;बार्शी शहर व तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने तहसीलदार एफ. आर. शेख यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या दीर्घकालीन पाठपुराव्यानंतर १० ऑक्टोबर २०२४ रोजी मंत्रिमंडळाने स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ मंजूर केले होते. मात्र निर्णय होऊनही अंमलबजावणी न झाल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजी आहे.

उन्हा-पाऊस-थंडीला तोंड देत पहाटेपासून घरोघरी वर्तमानपत्र पोहोचवणाऱ्या विक्रेत्यांच्या अडचणी लक्षात घेऊन महामंडळ तातडीने कार्यान्वित करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे तहसील कार्यालयामार्फत पाठवण्यात आले.

बार्शी तालुका संघटनेचे अध्यक्ष सचिन सुरेश बाबर यांच्यासह सोमनाथ गाढवे, बाबासाहेब जाधव, बंडू नागटिळक, शरद काकडे, ज्योतीराम बारुंगळे, सचिन शेटे, ताहेर काजी, सादिक शेख, सुरज कोतमिरे, शिवाजी वैकुटे, मुजाहिद काजी, शाम थोरात आदी विक्रेते उपस्थित होते.

राज्यात इतर ठिकाणीही अंमलबजावणीसाठी आंदोलन सुरू आहेत. निर्णय कागदावरच राहिल्यास आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, अशी भूमिका विक्रेत्यांनी मांडली.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**