*बार्शीत स्पा सेंटरच्या आड देहविक्री उघड; लेडी सिंघम अंजना कृष्णा यांच्या पथकाची धडक कारवाई*
*बार्शीत स्पा सेंटरच्या आड देहविक्री उघड; लेडी सिंघम अंजना कृष्णा यांच्या पथकाची धडक कारवाई*
KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, सोलापूर : बायपास रोडवरील मुनलाईट स्पा सेंटरवर स्पा आणि मसाजच्या नावाखाली देहविक्री सुरू असल्याच्या तक्रारींवरून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या विशेष पथकांनी छापा टाकला.
या कारवाईत स्पा सेंटरच्या आडून देहविक्री चालत असल्याचे उघड झाले. चार ते पाच महिला मसाजच्या नावाखाली यात गुंतलेल्या आढळल्या. स्पा सेंटरचा मालक आणि संबंधित महिलांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध व्यवसायात खळबळ उडाली आहे.
अंजना कृष्णा यांनी यापूर्वीही सोलापूर जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई केली आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये माढा तालुक्यातील कुर्डू गावात रस्त्याच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध मुरुम उत्खननावर त्यांनी छापा टाकला. राजकीय दबाव आला तरी त्यांनी कर्तव्यात ढील दिली नाही. प्रशासकीय चौकशीत उत्खनन अवैध असल्याचे आणि त्यांची कारवाई योग्य असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल झाला.
मे २०२६ मध्ये बार्शी शहरातील बालाजी कॉलनी परिसरात त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा छापा टाकण्यात आला. दोन टेम्पो भरून लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. याशिवाय बार्शीत कला केंद्र आणि स्पा-मसाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या जुगार अड्ड्यांवरही त्यांच्या देखरेखीखाली कारवाई झाली आहे.
प्रत्येक कारवाईत तथ्य आढळून येत असल्याने अंजना कृष्णा यांची कार्यपद्धती जनतेत चर्चेत राहिली आहे. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यामुळे पोलीस विभागावरील विश्वास अधिक दृढ होत आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या