*दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी; शुल्क वसूल केल्यास महाविद्यालयांवर कारवाई*

**दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी; शुल्क वसूल केल्यास महाविद्यालयांवर कारवाई** 

KDM NEWS प्रतिनिधी;राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर झाल्यानंतर संबंधित भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाने परीक्षा शुल्क माफीचे परिपत्रक जारी केले आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमधील प्रथम सत्राच्या परीक्षांसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जाणार नाही.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही भूमिका स्पष्ट केली असल्याने शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संबंधित अधिकाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत की, शासनाच्या निर्देशांचे पालन सुनिश्चित करावे. उल्लंघन करणाऱ्या संस्थांची दखल घेऊन नियमानुसार कारवाई करावी. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना दिलासा देणे ही शासनाची प्राथमिकता असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

दुष्काळामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने अतिरिक्त भार टाळण्यासाठी शासनाच्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

#दुष्काळनिवारण  
#FarmerWelfare  
#परीक्षाशुल्कमाफी  
#मराठवाडा  
#विद्यार्थीदिलासा

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**