*बार्शी तालुका पोलिसांची धडक कारवाई** आगळगाव व धसपिंपळगाव येथे प्रतिबंधित गुटखा-तंबाखू व अवैध दारू साठा जप्त*

*बार्शी तालुका पोलिसांची धडक कारवाई**  
आगळगाव व धसपिंपळगाव येथे प्रतिबंधित गुटखा-तंबाखू व अवैध दारू साठा जप्त* 

KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, १३ ऑक्टोबर  
बार्शी तालुका पोलीस ठाण्याने ११ ऑक्टोबर रोजी प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि अवैध दारू विक्रीविरोधात दोन वेगवेगळ्या गावांत कारवाई केली. या कारवाईत एकूण ₹२०,३२४ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आगळगाव येथील दशरथ किराणा स्टोअरवर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास छापा टाकण्यात आला. येथे उदय संजय कोल्हे (वय २४, रा. आगळगाव) याच्याकडून केआर १०००, केसरयुक्त विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखू, डायरेक्टर स्पेशल पानमसाला आणि शॉट लक्झरी च्युइंग टोबॅको असा एकूण ₹१७,७३४ किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा क्रमांक ३३०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता व अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आला आहे.

त्याच दिवशी धसपिंपळगाव येथे अवैध दारू साठ्यावर दोन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. सायंकाळी ५.४० वाजता जिवलग हॉटेलच्या पाठीमागे आडोश्यात चंद्रकांत बलभीम पिंगळे (वय ५८) याच्याकडे देशी दारूच्या १८० मिलीच्या ११ सीलबंद बाटल्या (₹८८०) मिळाल्या. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता नदीशेजारी मुन्ना भालेकर यांच्या पत्राशेडमागे संतोष अर्जुन धस (वय ५१) याच्याकडे देशी दारूच्या १२ बाटल्या व रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्कीच्या तीन बाटल्या (एकूण ₹१,७१०) जप्त करण्यात आल्या. दोन्ही प्रकरणांत महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वात पार पडली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, आबासाहेब शिरगिरे तसेच पोलीस अंमलदार सोमनाथ खांडेकर, अमृत खेडकर, गणेश दळवी, अमृता गुंड, प्रदीप चौधरी, महेश माने, ओमप्रकाश दासरे, रोहित बागल व अश्विनी साबळे यांचा सहभाग होता.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के व संबंधित तपासी अंमलदार करीत आहेत. बार्शी तालुका पोलीस ठाण्याने प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि अवैध दारू विक्रीविरोधात कायद्यानुसार कारवाई सुरू ठेवल्याचे स्पष्ट केले आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**