*बार्शीत संघाचे भव्य पथसंचलन; बाल-तरुण-ज्येष्ठ स्वयंसेवकांचा उत्साही सहभाग*
*बार्शीत संघाचे भव्य पथसंचलन; बाल-तरुण-ज्येष्ठ स्वयंसेवकांचा उत्साही सहभाग*
KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. २० ऑक्टोबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बार्शी शहर शाखेच्या वतीने शहर आणि ग्रामीण भागातील स्वयंसेवकांच्या सहभागाने पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. बाल, तरुण आणि ज्येष्ठ स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने व उत्साहाने सहभाग नोंदवला.
मॉडेल हायस्कूलच्या मैदानावरून संचलन निघाले. प्रथम भगव्या ध्वजाचे पूजन सौ. रेणुका शिरीष जाधव, सौ. पूजा विशाल बुडूख आणि सौ. किरण अविनाश ढाळे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर संचलनास प्रारंभ झाला.
महाद्वार चौक, वीर सावरकर चौक, आझाद चौक, टिळक चौक, आडवा रस्ता आणि पांडे चौक या प्रमुख मार्गांवरून संचलन मार्गस्थ झाले. शहरातील महिलांनी रांगोळ्या काढून आणि नागरिकांनी पुष्पवृष्टी करून संचलनाचे स्वागत केले. दोन्ही बाजूंनी नागरिकांची गर्दी जमली होती.
संचलनाचा समारोप मॉडेल हायस्कूल येथे झाला. यावेळी डॉक्टर, वकील, व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, व्यावसायिक आणि महिला उपस्थित होत्या. जिल्हा कार्यवाह श्री. ऋषिकेश कुलकर्णी, तालुका संघचालक श्री. आनंद सोमाणी आणि तालुका कार्यवाह श्री. अरुण ग्रामोपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी संचलन यशस्वीपणे पार पाडले.
समारोपानंतर उपस्थितांनी एकमेकांना दसरा आणि विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या