*बार्शीत सामायिक विहिरीच्या पाण्यावरून भावाभावांत तुंबळ हाणामारी; ५५ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी!*
*बार्शीत सामायिक विहिरीच्या पाण्यावरून भावाभावांत तुंबळ हाणामारी; ५५ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी!*
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, २३ ऑक्टोबर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील धोत्रे गावात सामायिक विहिरीच्या पाण्याच्या वादातून भावाभावांमध्ये हाणामारी झाली. यात ५५ वर्षीय शेतकरी जखमी झाला असून त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, फिर्यादी कुडंलिक प्रल्हाद जाधवर (वय ५५, रा. धोत्रे) यांनी सांगितले की, २० ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजता ते शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गट क्रमांक ३३ मधील विहिरीकडे गेले. त्यापूर्वीच त्यांचा मोठा भाऊ विठ्ठल प्रल्हाद जाधवर यांनी मोटार चालू केली होती. कुडंलिक यांनी मोटार बंद करून आपल्या पिकाला पाणी देण्याची मागणी केली. यावर विठ्ठल यांनी रागाने शिवीगाळ केली आणि घरासमोर पडलेल्या लोखंडी खोऱ्याने कुडंलिक यांच्या डाव्या भुवईवर व डाव्या खांद्याच्या समोरच्या बाजूस मारहाण केली.
यावेळी कुडंलिक यांची पत्नी इंदुबाई आणि सून सरस्वती पळत आल्या. तिघांनी एकत्र येऊन विठ्ठल यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र विठ्ठल यांनी पुन्हा शिवीगाळ व दमदाटी केली आणि विहिरीवरील मोटार चालू करू नये, असे बजावले होते.
या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात २० ऑक्टोबर रोजी रात्री १०.५० वाजता गुन्हा क्रमांक ३३९/२०२६ नोंदविण्यात आला. भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५१(२) आणि ३५२ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपी विठ्ठल प्रल्हाद जाधवर (रा. धोत्रे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या