*‘समाजाचं काहीतरी देणं लागतो’ – महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रतापचा कौतुकास्पद पुढाकार*

*‘समाजाचं काहीतरी देणं लागतो’ – महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रतापचा कौतुकास्पद पुढाकार* 

KDM NEWS प्रतिनिधी‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापने ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. ‘पारिजात’ संस्थेच्या सहकार्याने ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील नदीचवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या पुनर्बांधणीचा उपक्रम त्याने हाती घेतला आहे.

कमी पटसंख्येमुळे बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या या शाळेतील ग्रामीण मुलांचे शिक्षण थांबू नये, यासाठी पृथ्वीकने पुढाकार घेतला. कधीकाळी गोदाम म्हणूनही वापरल्या जाणाऱ्या या जर्जर इमारतीची संपूर्ण पुनर्बांधणी आणि विकास करण्याचे काम ‘पारिजात’ संस्था, स्थानिक रहिवासी तसेच स्वप्नील पाथरे यांच्या मदतीने सुरू आहे.

पुनर्बांधणीनंतर वीटभट्टी कामगारांच्या मुलांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे. एकेकाळी अडचणीत आलेल्या या शाळेची विद्यार्थी संख्या आता **२४** वर पोहोचली आहे.

अभिनयासोबत सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केलेला हा प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पृथ्वीक गेल्या काही वर्षांपासून शहापूर तालुक्यातील काही शाळांच्या पुनर्बांधणीसाठीही काम करत आहे. “आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो” ही भावना त्याच्या या उपक्रमामागे आहे.

शिक्षणासाठी उचललेल्या या पावलामुळे पृथ्वीक प्रतापचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

#PrithvikPratap #MaharashtrachiHasyaJatra #Education #MarathiSchool #SocialWork #sangharshachigoshta


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**