*बार्शीत डिलक्स स्पावर छापा; कुंटणखाना चालवणाऱ्या दोघांवर गुन्हा, दोन महिलांची सुटका*
*बार्शीत डिलक्स स्पावर छापा; कुंटणखाना चालवणाऱ्या दोघांवर गुन्हा, दोन महिलांची सुटका*
KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, १२ ऑक्टोबर : बार्शी बायपास रोडवरील नागोबाचीवाडी शिवारातील डिलक्स स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, सोलापूर ग्रामीणच्या पथकाने १० ऑक्टोबर रोजी रात्री ११.१० वाजता छापा टाकला. या कारवाईत स्पाचा कुंटणखाना म्हणून वापर करणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
आरोपींची नावे अशी आहेत – बाबाभाई खाजाबाई चौधरी , सुरत, गुजरात जो डिलक्स स्पाचा मॅनेजर आहे आणि आकाश काशीद (रा. बार्शी), जो स्पाचा मालक आहे. फिर्यादी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोहेकॉ / ८३२ सूर्यकांत ठाकरू जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी संगनमत करून स्पा सेंटरचा कुंटणखाना म्हणून वापर केला. महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले आणि त्यांच्या कमाईवर स्वतःची उपजीविका चालवली.
गुन्हा बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३२५/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १४३(२), १४४(२), ३(५) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, ६ अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. गुन्हा ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.२८ वाजता पोलीस नाईक १२६८ काळेल यांनी नोंदवला. तपासी अधिकारी पोनि महादेव चव्हाण (नियंत्रण कक्ष, सोलापूर ग्रामीण) आहेत.
सुटका करण्यात आलेल्या दोन्ही महिलांच्या वय २५ व ४५ वर्षे असून त्या मूळच्या मिझोराम राज्यातील आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून ५०० रुपयांच्या पाच चलनी नोटा (क्रमांक OPS १३८०६६, ७QG ६५९९९७, ३CN ३६१२०९, ७CS ४७४९९२, २EF २४३९६५) असे एकूण २५०० रुपये तसेच न्यू उस्ताद कंपनीचे एक सिलबंद निरोध पाकीट जप्त केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक, बार्शी तालुका पोलीस ठाणे यांनी हे प्रकरण सादर केले आहे. पुढील तपास सुरू आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या