**जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला दुचाकीची धडक; युवक जखमी** **सात रस्ता चौकातील धोकादायक टर्न अजूनही कायम**

**जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला दुचाकीची धडक; युवक जखमी**  
**सात रस्ता चौकातील धोकादायक टर्न अजूनही कायम** 

KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर :** जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या शासकीय वाहनाला गुरुवारी रात्री एका वेगात येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक युवक किरकोळ जखमी झाला. त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज संपवून घरी जात असताना रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. जिल्हा नियोजन भवन समोरील वळणातून सात रस्ता चौकाकडे शासकीय वाहन टर्न घेत असताना पत्रकार भवनकडून एक दुचाकी अती वेगाने आली. समोर असलेल्या इतर गाड्यांना चुकवत ती थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला धडकली. या धडकेत युवकाच्या खांद्याला मुका मार लागला.

अपघातानंतर जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी ताबडतोब कर्मचाऱ्यांना युवकाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचे निर्देश दिले. कर्मचाऱ्यांनी त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाहनांना सात रस्त्याकडे जाण्यासाठी जिल्हा नियोजन भवन समोरून टर्न घ्यावा लागतो. दुभाजकावरील झाडांमुळे कंबर तलावाकडून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे अपघातांची शक्यता नेहमीच असते. पत्रकारांनी यापूर्वी लक्ष वेधल्यानंतर एका ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्यात आला. तरीही दृश्यमानतेची समस्या कायम असल्याने असे अपघात वारंवार घडत आहेत. या धोकादायक ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**