*बार्शीत कल्याण मटका जुगार खेळताना सहा जणांना अटक; रोख रक्कम आणि मोबाईल जप्त*

*बार्शीत कल्याण मटका जुगार खेळताना सहा जणांना अटक; रोख रक्कम आणि मोबाईल जप्त* 

KDM NEWS प्रतिनिधी बार्शी:बार्शी पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ७८०/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.१३ वाजता पोस्ट चौक, बार्शी येथे इंडियन बेकरी समोर पत्रा शेडच्या आडोशाला सहा जण कल्याण मटका जुगार खेळत असताना पकडण्यात आले. त्यांनी रस्त्याने ये-जा करणाऱ्या लोकांकडून तसेच मोबाईल फोनद्वारे पैसे घेऊन अंदाजे आकड्यांवर पैज लावत असल्याचे आढळून आले.

आरोपींची नावे:  
१) दत्तात्रय संतोष गंधे (वय २१), सुभाष चौक तळवाडीजवळ, बार्शी  
२) बालाजी राजाराम सुतार (वय ३६), कुर्जुवाडी रोड जैन मंदिराजवळ, बार्शी  
३) शरीफ गुलाब तांबोळी (वय ५४), बालाजी कॉलनी, बार्शी  
४) बापु दगडू गुळवे (वय ५०), जवळा खुर्द, ता. कळंब, जि. धाराशिव  
५) कर्ण सोमनाथ इंगळे (वय ३८), कुर्कुवाडी रोड जैन मंदिराजवळ, बार्शी  
६) सतीश सुभाष नवगण (वय ४३), भवानी पेठ, बार्शी  

घटनास्थळी मटक्याच्या आकड्यांवर गोलाकार रिंगणात एकूण ३४,३७३ रुपये रोख रक्कम (५००, २००, १००, ५०, २०, १० रुपयांच्या नोटा तसेच १०, ५ व १ रुपयाची नाणी) जप्त करण्यात आली. तसेच विविध कंपनींचे (रेडमी, रिअलमी, व्हिव्हो, जिओ, एसीई, सॅमसंग) सात मोबाईल फोनही जप्त करण्यात आले. त्यांचे अंदाजे मूल्य एकूण सुमारे ८४,८७३ रुपये इतके आहे. काही मोबाईल आरोपींच्या अंगवळती मिळाले.

फिर्यादी पोलीस वाचक शाखा, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या वतीने आहे. मा. पोलीस निरीक्षक, सोलापूर यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास कोतवाल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**