*केंद्रीय पथकाकडून बार्शी तालुक्यातील दुष्काळी स्थितीची प्रत्यक्ष पाहणी; पानगाव, उपळाई ठों. परिसराला भेट*

*केंद्रीय पथकाकडून बार्शी तालुक्यातील दुष्काळी स्थितीची प्रत्यक्ष पाहणी; पानगाव, उपळाई ठों. परिसराला भेट* 

*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, ९ ऑक्टोबर २०२६ : खरीप हंगाम २०२६ मधील पावसातील खंड आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे ट्रिगर-१ अंतर्गत समाविष्ट झालेल्या बार्शी तालुक्यात आज केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाचा दौरा झाला. पथकाने पानगाव आणि उपळाई ठों. येथे प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

केंद्र शासनाचे तीन वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञ या पथकात होते. त्यांच्यासोबत राज्याचे कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी सोलापूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, कृषी सहसंचालक, अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार बार्शी, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि इतर विभागीय अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्ष, संबंधित सरपंच, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने शेतकरीही हजर होते.

पाहणीदरम्यान पानगाव येथील पाणी साठवण तलावाची तपासणी करून पाणी उपलब्धतेची स्थिती जाणून घेण्यात आली. खरीप पिकांची सद्यस्थिती, नुकसान, पशुधनासाठी चारा उपलब्धता, पावसातील खंडामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि परिसराची भौगोलिक स्थिती याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. पथकाने स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची अवस्था, पावसाच्या अनियमिततेचा परिणाम आणि अडचणी जाणून घेतल्या. संबंधित विभागांकडून पीकनुकसान, पाणी आणि चारा याबाबतची माहितीही घेतली.

या प्रत्यक्ष पाहणीमुळे बार्शी तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचे वस्तुस्थितीदर्शक आकलन होण्यास मदत होणार आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**