*राहुल गांधी, प्रणिती शिंदेंच्या अटकेचे सोलापुरात पडसाद; काँग्रेसच्या आंदोलनात पोलीस अन् कार्यकर्त्यांमध्ये झटापट*
*राहुल गांधी, प्रणिती शिंदेंच्या अटकेचे सोलापुरात पडसाद; काँग्रेसच्या आंदोलनात पोलीस अन् कार्यकर्त्यांमध्ये झटापट*
निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप करत शहर काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, फ्रंटल सेलचे कार्यकर्ते, विभागीय पदाधिकारी आणि समर्थक मोठ्या संख्येने जमले.
आंदोलनात निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि ‘वोटचोरी’च्या मुद्द्यावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाने प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी घोषणाबाजी झाली.
दरम्यान, पोलिसांनी आंदोलनातील बॅनर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला. काँग्रेस पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला. बॅनर घेण्यावरून ओढाओढ आणि झटापट झाली. यात काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांचा शर्ट फाटल्याचे आणि काही कार्यकर्त्यांना ढकलाढकली झाल्याचे आरोप काँग्रेसकडून करण्यात आले.
या प्रकारामुळे आंदोलनस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत लोकशाही मार्गाने सुरू असलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या