*पोलीस स्मृतिदिनी नायगाव मुख्यालयात हुतात्म्यांना मानवंदना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आदरांजली*
*पोलीस स्मृतिदिनी नायगाव मुख्यालयात हुतात्म्यांना मानवंदना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आदरांजली*
*KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, २१ ऑक्टोबर** – पोलीस स्मृतिदिनानिमित्त आज नायगाव येथील पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र वाहून देशभरातील शहीद पोलीस हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
गेल्या वर्षभरात (१ सप्टेंबर २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२६) कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेल्या ३६ पोलीस अधिकारी आणि ११८ पोलीस अंमलदार अशा एकूण १५४ हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना मुख्यमंत्र्यांनी विनम्र अभिवादन केले. त्यांच्या असीम ध्येयनिष्ठा, शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करत त्यांनी संदेशपत्राचे वाचन केले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महापौर रितू तावडे, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनीही पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. पोलिस दलाने बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली.
मुख्यमंत्र्यांनी विविध देशांच्या दूतावासातील निमंत्रित, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शहीद पोलिसांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पोलीस स्मृतिदिन दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या