**बंगळुरूत एसआयआरविरोधात पीपल्स ट्रिब्युनल; ध्रुव राठी-अभिजीत दिपके-प्रकाश राज यांचा सहभाग**
*बंगळुरूत एसआयआरविरोधात पीपल्स ट्रिब्युनल; ध्रुव राठी-अभिजीत दिपके-प्रकाश राज यांचा सहभाग*
KDM NEWS प्रतिनिधी बंगळुरू, ८ ऑक्टोबर : निवडणूक आयोगाच्या विशेष गहन पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन-एसआयआर) प्रक्रियेविरोधात गुरुवारी बंगळुरूतील फ्रीडम पार्कमध्ये कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) तर्फे ‘पीपल्स ट्रिब्युनल’ आणि आंदोलन झाले. यात सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके, युट्युबर ध्रुव राठी आणि अभिनेते-सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राज यांचा प्रमुख सहभाग होता.
कर्नाटकातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या मतदारांनी ट्रिब्युनलसमोर आपली नावे मतदार यादीतून वगळल्याचे किंवा जिवंत असूनही मृत दाखवल्याचे साक्ष दिल्या. ट्रिब्युनलनंतर चप्पल प्रदर्शनही झाले.
**मागण्या आणि घोषणा**
आंदोलकांनी एसआयआर रद्द करावी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागितला. “एसआयआर रद्द करा”, “ज्ञानेश कुमार गद्दी सोडा”, “व्होट चोर” अशा घोषणा फ्रीडम पार्कमध्ये गुंजायला लागल्या. विद्यार्थी, महिला आणि नागरिक संघटनांचे मोठे प्रमाणात सहभाग होते.
**ध्रुव राठी म्हणाले...**
ध्रुव राठी यांनी सांगितले की, ही त्यांची भारतातील पहिली आंदोलनातील सहभागिता आहे. “मी सत्ताबदल करायला आलो नाही. निवडणूक आयोगात पारदर्शकता आणि जबाबदारी शून्य आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. कर्नाटकातील १०० मतदान केंद्रांवरील अनियमिततांचा अहवाल त्यांनी सादर केला. पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशातील मतदार याद्यांतील बदलांबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
**अभिजीत दिपके आणि प्रकाश राज**
अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मतचोरी आणि लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप केला. आंदोलन ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यापर्यंत सुरू राहील, असे त्यांनी सांगितले. प्रकाश राज यांनीही एसआयआर रद्द करण्याची मागणी केली आणि नागरिकांच्या हक्कांवर हल्ला झाल्याचे सांगितले.
या आंदोलनात सीजेपीचे सहसंयोजक आणि इतर युवक संघटनांचेही सहभाग होते. १० ऑक्टोबरला दिल्लीतील जंतरमंतरवरही असेच आंदोलन होणार असल्याचे सांगण्यात आले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या