*बार्शी : कॅप्टन बाळासाहेब डमरे यांनी वाढदिवस रद्द करून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत*
*बार्शी : कॅप्टन बाळासाहेब डमरे यांनी वाढदिवस रद्द करून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत*
KDM NEWS प्रतिनिधी बार्शी तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकरी बांधवांवर आलेल्या संकटाला लक्षात घेऊन भारतीय सेनेत कार्यरत कॅप्टन बाळासाहेब डमरे यांनी आपला वाढदिवस सोहळा रद्द केला. वाढदिवसावर होणारा खर्च दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी वापरण्यात आला.
डोराळे येथील उर्मिला चंद्रकांत धायगुडे या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आणि संतोष सुरेश शिंदे या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत स्वरूपात मदत देण्यात आली. यावेळी कॅप्टन बाळासाहेब डमरे यांच्यासह माजी नगरसेवक दिलीपकुमार डमरे, आदर्श उद्योग समूहाचे रविंद्र अण्णासाहेब राऊत, प्रसाद डमरे, दारोले गावचे सरपंच अमोल शिंदे, शेखर जगताप, सोनू शिंदे, समाधान देशमुख, राहुल खरात, ग्रामपंचायत सदस्य अमोल शिंदे, सरपंच दत्ता चोरमले, दूध डेअरी चेअरमन नंदू शिंदे, नितीन जाधव, अमोल राजगुरू, शरद शिंदे, बाबासाहेब रड्डी व इतर सहकारी उपस्थित होते.
कॅप्टन डमरे यांनी देशसेवा करत असतानाही सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श घालून दिला आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी कुटुंबांना थेट मदत करण्याचा हा उपक्रम परिसरात कौतुकास्पद ठरला आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या