*बार्शी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस द्यावा; कर्मचारी समन्वय समितीची मागणी*

*बार्शी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस द्यावा; कर्मचारी समन्वय समितीची मागणी* 

KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : बार्शी नगरपरिषदेतील संवर्ग अधिकारी, स्थानिक लिपिक, शिपाई आणि सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस किंवा सानुग्रह अनुदान मंजूर करावे, अशी मागणी सोलापूर जिल्हा नगरपरिषद-नगरपंचायती कर्मचारी समन्वय समितीने केली आहे.

समितीने नगराध्यक्षा सौ. तेजस्विनीताई कथले आणि मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांना लेखी निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, हे कर्मचारी प्रशासकीय कामकाज, शहर स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा आणि इतर नागरी सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे आणि अहोरात्र काम करतात. सफाई कर्मचारी विशेषतः प्रतिकूल परिस्थितीतही कर्तव्य बजावतात.

दिवाळी हा आनंदाचा सण असल्याने कर्मचाऱ्यांना कुटुंबासमवेत सण साजरा करता यावा यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोनस किंवा सानुग्रह अनुदान मंजूर करून आवश्यक प्रशासकीय व आर्थिक तरतूद करावी, अशी विनंती समितीने केली आहे.

या निवेदनाची माहिती विधान परिषद सदस्य आमदार राऊत यांनाही देण्यात आली आहे

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**

**बार्शी तालुक्यात हल्ल्यांच्या घटना वाढल्या; बिबट्या व वाघाची दहशत, बार्शीतील चुंबमध्ये शेतकऱ्यांच्या गाईवर हल्ला**