*बार्शी-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू*
*बार्शी-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू*
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, ९ नोव्हेंबर – बार्शी ते सोलापूर रस्त्यावरील शेळगाव (आर) शिवारात यशराज हॉटेलजवळ रविवारी (८ नोव्हेंबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला.
भालगाव (ता. बार्शी) येथील पांडुरंग यशवंत सरवदे (वय ५०) हे लुना मोटरसायकल (एमएच १३ ईपी ८८९०) वरून जात असताना सासुरे (ता. बार्शी) येथील वैभव वसंत ताकभाते यांनी चालविलेल्या Ertiga कार (एमएच १३ ईके ५६८६) ने समोरून जोरदार धडक दिली. धडकेत सरवदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ते जागीच मयत झाले. लुना मोटरसायकल मोडतोड होऊन आग लागून काळसर झाली होती. Ertiga कारच्या समोरील भागाचे नुकसान झाले. दोन्ही वाहनांचे अंदाजे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले.
सरवदे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कळमण येथे गेले होते. अपघाताची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक आणि गावकरी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ग्रामीण रुग्णालय, बार्शी येथे पाठविण्यात आला. नातेवाईकांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत कारचालकाने अविचाराने, हयगईने आणि भरधाव वेगाने वाहन चालविल्याने हा अपघात झाल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या