*चिखर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीची सभा; औषधे-लसींचा तातडीचा पुरवठा करण्याची मागणी*

*चिखर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीची सभा; औषधे-लसींचा तातडीचा पुरवठा करण्याची मागणी* 

KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, ४ नोव्हेंबर : चिखर्डे येथील आयुष्मान आरोग्य मंदिर-प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. समितीच्या अध्यक्षा तसेच पांगरी जिल्हा परिषद गट सदस्य व सोलापूर जिल्हा परिषद अर्थ समिती सदस्य डॉ. सौ. रेश्मा देवेंद्र डोके यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.

सभेत केंद्रातील विविध समस्या, इमारतीच्या दुरुस्तीचा प्रश्न आणि अपुऱ्या कर्मचारी वर्गाच्या गरजेबाबत सविस्तर चर्चा झाली. रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पार्टी डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. देवेंद्र रामलिंग डोके यांनी सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कुपडवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. चिखर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधे, लसी, इंजेक्शन आणि इतर आवश्यक वैद्यकीय साहित्य तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कुपडवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व समस्या लवकरच दूर केल्या जातील आणि आवश्यक साहित्याचा पुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

सभेस बार्शी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बांगर, मेडिकल ऑफिसर डॉ. कदम, आरोग्य समिती सदस्य केशव मोरे, फुलचंद पालखे, दिनराज धावारे तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**

**बार्शी तालुक्यात हल्ल्यांच्या घटना वाढल्या; बिबट्या व वाघाची दहशत, बार्शीतील चुंबमध्ये शेतकऱ्यांच्या गाईवर हल्ला**