*धाराशिव येडशीत दिवाळीच्या मध्यरात्री भीषण आग; करंडे कुटुंबातील सहा जणांचा गुदमरून मृत्यू*
*धाराशिव येडशीत दिवाळीच्या मध्यरात्री भीषण आग; करंडे कुटुंबातील सहा जणांचा गुदमरून मृत्यू*
*KDM NEWS प्रतिनिधी येडशी : धाराशिव तालुक्यातील येडशी गावात दिवाळीच्या रात्री (९ नोव्हेंबर २०२६) सुमारे २ ते २.३० वाजता करंडे किराणा स्टोअर्स अँड गिफ्ट वेअर या दुकानाला भीषण आग लागली. दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या करंडे कुटुंबातील सहा जणांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. एक व्यक्ती बचावली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
मृत व्यक्तींची नावे आणि वय: उत्तम त्रिंबक करंडे (७५), चंद्रकला उत्तम करंडे (७०), गोविंद उत्तम करंडे (४७), ज्योती गोविंद करंडे (४२), गायत्री गोविंद करंडे (१६) आणि सिद्धी गोविंद करंडे (१५). यात तीन पिढ्यांचा समावेश आहे.
घरात दिवाळीनिमित्त लावलेल्या पणत्यांमुळे आग लागण्याची प्राथमिक शक्यता आहे. किराणा दुकानातील साहित्याने आग वेगाने पसरली. रात्रीची वेळ आणि वरच्या मजल्यावर घर असल्याने कुटुंबीयांना बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला नाही. धुराचे लोट घरात कोंडले गेले. काही जणांना भाजण्याच्या जखमा झाल्या, तर बहुतांशाचा मृत्यू गुदमरून झाला.
ग्रामस्थांनी आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. आग पहाटे सुमारे ५ वाजेपर्यंत धुमसत होती. आमदार राणा जगजितसिंह पाटील पहाटे ४.२० वाजता घटनास्थळी पोहोचले. मृतदेह धाराशिव शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस आणि फॉरेन्सिक तपास सुरू आहे.
येडशी गावाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी दुर्घटना मानली जात असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मृतदेहांचे अंतिम संस्कार येडशी येथील श्मशानभूमीत करण्यात येणार आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या