*बार्शीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन; विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार*

*बार्शीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन; विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार* 

KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, १७ नोव्हेंबर : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त येथे अभिवादन कार्यक्रम श्रद्धापूर्वक पार पडला. उपस्थित शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

कार्यक्रमात बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी आणि जनसामान्यांसाठी केलेल्या कार्याची आठवण करून दिली गेली. संघटन अधिक मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. उपस्थितांनी बाळासाहेबांच्या विचारांशी आणि शिवसेनेच्या तत्त्वांशी अखंड निष्ठा ठेवण्याची ग्वाही दिली तसेच विचारांशी तडजोड न करता समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्पही व्यक्त केला.

या वेळी जेष्ठ शिवसैनिक आण्णा डोईफोडे, मंगल ताई पाटील, माजी नगरसेवक बापू जाधव, देवा दिंडोरे, धनाजी वाणी, भीमराव गंधुरे, बाळासाहेब मुढे यांच्यासह युवासेनेचे राज्य विस्तारक हेमंत रामगुडे, युवासेना जिल्हाप्रमुख पांडुरंग घोलप, युवासेना जिल्हासचिव दिपक तिवाडी, युवासेना तालुकाप्रमुख स्वराज क्षीरसागर, युवासेना शहर प्रमुख अर्जुन सोनवणे, किरण स्वामी, शैलेश माने यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. उपस्थितांनी बाळासाहेबांच्या जीवनातील आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**

**बार्शी तालुक्यात हल्ल्यांच्या घटना वाढल्या; बिबट्या व वाघाची दहशत, बार्शीतील चुंबमध्ये शेतकऱ्यांच्या गाईवर हल्ला**