*पवारांच्या दौऱ्यादरम्यान बेकायदा वाळू वाहतुकीचा टिपर पलटी; दोन ब्रास वाळू जप्त, चालकावर गुन्हा*

*पवारांच्या दौऱ्यादरम्यान बेकायदा वाळू वाहतुकीचा टिपर पलटी; दोन ब्रास वाळू जप्त, चालकावर गुन्हा* 

KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात १ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास बेकायदा वाळू वाहतूक करणारा टिपर पलटी झाला. या प्रकरणी ग्राम महसुल अधिकारी कल्पना गिन्यान काळे यांनी ५ नोव्हेंबर रोजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

         घटनाक्रम
- शरदचंद्र पवार यांचा तुळशी येथे दुष्काळी पाहणी दौरा असल्याने तहसिलदार संजय भोसले व कर्मचारी वरवडे ते तुळशी कडे जात होते.
- वरवडे गावात एक टिपर वाळू घेऊन जात असताना दिसला. चालक घाबरून टिपर वरवडे-तुळशी वळणावर पलटी झाला.
- टिपरमधून दोन ब्रास वाळू बाहेर पडली.
- तहसिलदारांनी चालकाचे नाव विचारले असता वैभव लक्ष्मण पराडे (रा. बाभुळगाव, ता. माळशिरस) असे सांगितले. रायल्टी परवाना नसल्याचेही त्याने कबूल केले.
- त्याच दिवशी सायंकाळी ५.३० ते ५.५५ दरम्यान दोन पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला. दोन ब्रास वाळू सापडली. अंदाजे किंमत ९,५०० रुपये.
- पंचनामा तहसिल कार्यालयात सादर करण्यात आला. टिपर तहसिल कार्यालयात घेण्यात आला.

      कारवाई
- ३ नोव्हेंबर रोजी तहसिल कार्यालयाच्या जा.क्र./जमाबंदी १/कावि/१२८३/२०२६ च्या आदेशानुसार अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक व साठा याबाबत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
- त्यानुसार ग्राम महसुल अधिकारी कल्पना काळे (वय २६, रा. माढा, मूळ रा. काकडदाभा ता. औंढानगरनाथ जि. हिंगोली) यांनी ५ नोव्हेंबर रोजी पोलीस ठाण्यात उशिरा फिर्याद दाखल केली.

**आरोप व कायदा**
वैभव लक्ष्मण पराडे याच्याविरुद्ध शासनाच्या संमतीशिवाय व विनापरवाना दोन ब्रास वाळू वाहतूक केल्याचा आरोप आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), पर्यावरण अधिनियम कलम ९ व १५ तसेच भारतीय गौण खनिज कायदा कलम ४(१) व ४(क) अंतर्गत सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

वरवडे येथे गेल्या दोन वर्षांपासून काम करणाऱ्या ग्राम महसुल अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबानुसार ही माहिती समोर आली आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**

**बार्शी तालुक्यात हल्ल्यांच्या घटना वाढल्या; बिबट्या व वाघाची दहशत, बार्शीतील चुंबमध्ये शेतकऱ्यांच्या गाईवर हल्ला**