**हॉटेल मालकाचा क्रूर चेहरा उघड; मॅनेजरला निर्वस्त्र करून लोखंडी पाईपने बेदम मारहाण, धमकी अन् व्हिडीओ व्हायरल केल्याने अटक**
**हॉटेल मालकाचा क्रूर चेहरा उघड; मॅनेजरला निर्वस्त्र करून लोखंडी पाईपने बेदम मारहाण, धमकी अन् व्हिडीओ व्हायरल केल्याने अटक** **KDM NEWS प्रतिनिधी**टेंभुर्णी : सोलापूर-पुणे महामार्गालगत टेंभुर्णी येथील प्रसिद्ध हॉटेल ‘७७७७’ चा मालक लखन हरिदास माने (वय ४२, रा. टेंभुर्णी, ता. माढा) याने आपल्याच हॉटेलच्या मॅनेजरला निर्वस्त्र करून सर्व कर्मचाऱ्यांसमोर लोखंडी पाईपने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२५ मध्ये घडला असला तरी मारहाणीचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत हॉटेल मालक लखन माने याला अटक केली आहे. फिर्यादी मॅनेजर निवास आप्पासाहेब नकाते (वय ४४) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात त्यांनी हॉटेलमधील काही अनियमिततेबाबत तक्रार केली होती आणि काम सोडण्याचा इशारा दिला होता. याच रागातून लखन माने संतापला. त्याने मॅनेजरला हॉटेलच्या आवारात बोलावून घेतले. तेथे त्याच्या अंगावरील कपडे जबरदस्तीने काढून टाकले, खिशातील दोन हजार रुपये हिसकावून घेतले आणि अर्धनग्न अवस्थेत सर्व कर्मचाऱ्यांसमोर उ...