**पुन्हा लॉकडाऊनची भीती? कोरोनाचा नवा ‘सुपर व्हेरिएंट’ BA.3.2 ने वाढवली चिंता; अमेरिकेतील २५ राज्यांत सापडले रुग्ण**
**पुन्हा लॉकडाऊनची भीती? कोरोनाचा नवा ‘सुपर व्हेरिएंट’ BA.3.2 ने वाढवली चिंता; अमेरिकेतील २५ राज्यांत सापडले रुग्ण** **KDM NEWS प्रतिनिधी नवी दिल्ली/वॉशिंग्टन, २५ मार्च २०२६: कोरोनाव्हायरसचा नवा ओमिक्रॉन उप-व्हेरिएंट BA.3.2 वेगाने पसरत असल्याने जगभरात पुन्हा एकदा टेन्शन वाढले आहे. अमेरिकेतील २५ हून अधिक राज्यांमध्ये हा व्हेरिएंट सांडपाण्याच्या नमुन्यांमधून आणि रुग्णांच्या क्लिनिकल सॅम्पल्समधून आढळला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, स्पाइक प्रोटीनमध्ये ७० ते ७५ बदल झाल्यामुळे हा व्हेरिएंट सध्याच्या लसींना चकवू शकतो आणि वेगाने पसरू शकतो. दक्षिण आफ्रिकेत नोव्हेंबर २०२४ मध्ये प्रथम आढळलेला हा BA.3.2 व्हेरिएंट आता अमेरिकेच्या अनेक राज्यांत (कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, फ्लोरिडा, टेक्साससह) विमानतळावरील सांडपाणी तसेच रुग्णांच्या नाकातील स्वॅबमधूनही समोर आला आहे. अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या अहवालानुसार, हा व्हेरिएंट JN.1 सारख्या पूर्वीच्या व्हेरिएंट्सपासून वेगळा आहे आणि त्यात मोठ्या प्रमाणात म्युटेशन्स आहेत. शास्त्रज्ञांचा खुलासा: स्वित...