**बार्शीच्या कव्हे गावात अवैध मुरूम उत्खननाचा धुमाकूळ; शासनाचा लाखो रुपयांचा महसूल पाण्यात**
**बार्शीच्या कव्हे गावात अवैध मुरूम उत्खननाचा धुमाकूळ; शासनाचा लाखो रुपयांचा महसूल पाण्यात** **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (बार्शी):**बार्शी तालुक्यातील कव्हे गावातील गावठाण क्षेत्रात सध्या अवैध मुरूम उपशाने कळस गाठला आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी दिवसाढवळ्या जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने मुरुमाचे उत्खनन केले जात असून, यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. **नियम धाब्यावर बसवून उत्खनन** मिळालेल्या माहितीनुसार, गावठाण हद्दीत कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी किंवा रॉयल्टी न भरता हा मुरुमाचा उपसा सुरू आहे. उत्खनन माफियांकडून मोठ्या प्रमाणात जमिनीचे खोदकाम केले जात असून, उपसा केलेला मुरूम खासगी कामांसाठी विक्री केला जात आहे. या बेकायदेशीर व्यवसायामुळे शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकला जात असतानाही स्थानिक प्रशासन सुस्त असल्याचे चित्र आहे. **प्रशासकीय दुर्लक्ष आणि 'अर्थ'पूर्ण संबंधांची नागरिकांमध्ये चर्चा** स्थानिक नागरिकांनी या उत्खननाबाबत महसूल विभाग आणि ग्रामपंचायतीकडे वारंवार तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्...