पोस्ट्स

**बार्शी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत डिजे-डॉल्बी लावल्याने दोन उत्सव मंडळांवर गुन्हे दाखल**

इमेज
**बार्शी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत डिजे-डॉल्बी लावल्याने दोन उत्सव मंडळांवर गुन्हे दाखल**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर) : जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘नो डिजे, नो डॉल्बी, नो लेझर लाइट’ आदेशाचे उल्लंघन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत उच्च आवाजातील डिजे आणि डॉल्बी सिस्टम वापरल्याने भीम गर्जना मित्र मंडळ व विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ, बार्शी यांच्यावर ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोलापूर जिल्हा प्रशासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर सर्व जयंती उत्सव मंडळांची बैठक घेऊन पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनी प्रदूषण नियमांचे पालन करण्याच्या सूचना आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘नो डिजे-नो डॉल्बी’ आदेशाची नोटीस सर्व मंडळांना देण्यात आली होती. तरीही १४ एप्रिल २०२६ रोजी बार्शी शहरात निघालेल्या मिरवणुकीत दोन्ही मंडळांकडून डिजे-डॉल्बी लावण्यात आले. नॉइज लेव्हल मशीनने केलेल्या मोजणीत या वाद्यांचा आवाज निर्धारित मर्यादेपेक्षा ...

**होर्मुझ सामुद्रधुनीत भारतीय जहाजांवर इराणी नौदलाचा गोळीबार; भारताने इराणी राजदूताला बोलावून तीव्र निषेध नोंदवला**

इमेज
**होर्मुझ सामुद्रधुनीत भारतीय जहाजांवर इराणी नौदलाचा गोळीबार; भारताने इराणी राजदूताला बोलावून तीव्र निषेध नोंदवला**  **KDM NEWS प्रतिनिधी नवी दिल्ली, १८ एप्रिल २०२६: होर्मुझ सामुद्रधुनीत इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या गनबोट्सनी दोन भारतीय ध्वज असलेल्या जहाजांवर गोळीबार केला. या घटनेत कोणतीही जखम किंवा जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही जहाजांना मागे वळावे लागले. भारत सरकारने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून, इराणचे भारतातील राजदूत डॉ. मोहम्मद फथाली यांना परराष्ट्र मंत्रालयाने आज संध्याकाळी बोलावून घेतले. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी राजदूत फथाली यांची भेट घेतली. या भेटीत भारताने ‘भारतीय ध्वज असलेल्या दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या गोळीबाराबाबत गंभीर चिंता’ व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, भारतीय नाविक आणि व्यापारी जहाजांची सुरक्षा ही भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारताने पूर्वी इराणकडून काही जहाजांना सुरक्षित मार्ग दिल्याचे स्मरण करून, आता भारताकडे जाणाऱ्या सर्व जहाजांसाठी लवकरात लवकर सुरक्षित मार्...

**नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या अपयशानंतर पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन**

इमेज
**नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या अपयशानंतर पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन**  **KDM NEWS प्रतिनिधी**नवी दिल्ली, १८ एप्रिल २०२६: नारी शक्ती वंदन अधिनियमाशी संबंधित १३१व्या संविधान संशोधन विधेयकाला लोकसभेत अपयश आल्यानंतर अवघ्या २४ तासांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री ८.३० वाजता राष्ट्राला संबोधित केले. सुमारे ३० मिनिटांच्या या थेट भाषणात त्यांनी देशातील महिलांना स्पष्टपणे माफी मागितली. “आमचे सर्व प्रयत्न असूनही नारी शक्ती अधिनियमातील सुधारणा करता आल्या नाहीत. यासाठी मी देशातील सर्व मातांना, भगिनींना आणि नारी शक्तीला माफी मागतो,” असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींनी भाषणाच्या सुरुवातीलाच नाराजी व्यक्त केली. “देशातील कोट्यवधी महिलांनी काल संसदेकडे डोळे लावले होते. विधेयकाचा पराभव झाल्यावर काही पक्ष टाळ्या वाजवत, बेंच वाजवत साजरा करत होते. हे केवळ टेबल ठोकणे नव्हते, तर महिलांच्या स्वाभिमानावर घाला घालणे होते. एक महिला अनेक गोष्टी विसरू शकते, पण आपला अपमान कधीही विसरत नाही,” असे ते म्हणाले. विधेयकाचा उद्देश स्पष्ट करताना मोदी म्हणाले, “हे विधेयक कोणाच्याही हक्कावर घाला घ...

**बार्शी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत डिजे-डॉल्बी लावल्याने दोन उत्सव मंडळांवर गुन्हे दाखल**

इमेज
**बार्शी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत डिजे-डॉल्बी लावल्याने दोन उत्सव मंडळांवर गुन्हे दाखल**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर) : जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘नो डिजे, नो डॉल्बी, नो लेझर लाइट’ आदेशाचे उल्लंघन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत उच्च आवाजातील डिजे आणि डॉल्बी सिस्टम वापरल्याने भीम गर्जना मित्र मंडळ व विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ, बार्शी यांच्यावर ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोलापूर जिल्हा प्रशासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर सर्व जयंती उत्सव मंडळांची बैठक घेऊन पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनी प्रदूषण नियमांचे पालन करण्याच्या सूचना आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘नो डिजे-नो डॉल्बी’ आदेशाची नोटीस सर्व मंडळांना देण्यात आली होती. तरीही १४ एप्रिल २०२६ रोजी बार्शी शहरात निघालेल्या मिरवणुकीत दोन्ही मंडळांकडून डिजे-डॉल्बी लावण्यात आले. नॉइज लेव्हल मशीनने केलेल्या मोजणीत या वाद्यांचा आवाज निर्धारित मर्यादेपेक्षा ...

**मुंगशीत अवकाळीने केला थरकाप! ८ टन बेदाणा चिखलात, शेतकरी हवालदिल**

इमेज
**मुंगशीत अवकाळीने केला थरकाप! ८ टन बेदाणा चिखलात, शेतकरी हवालदिल**  **KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी) : दि. १७ बार्शी तालुक्यातील मुंगशी व परिसरात गुरुवारी दुपारी अचानक आलेल्या तुफान वादळासह जोरदार अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. कडक उन्हाळ्यात उन्हाळी द्राक्ष शेतीच्या कामात व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी पडले. मुंगशीसह दहिटणे, सासुरे, राळेरास, तडवळे, यावली, ढोराळे, इर्लेवाडी आदी गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेली, तर शेतीमालाचे मोठे नुकसान झाले. मुंगशी येथील शेतकरी अर्जून श्रीपती क्षीरसागर यांनी दोन दिवसांपूर्वी जालींदर राऊत यांच्या बेदाणा शेडवर आपला द्राक्षाचा माल वाळवणीसाठी ठेवला होता. अचानक आलेल्या वादळाने शेडवरील शेडनेट व संरक्षक कागद उडवून लावला. त्यानंतर पडलेल्या जोरदार पावसाने शेड पूर्णपणे उघडा पडून अंदाजे ७ ते ८ टन बेदाणा पाण्यात भिजून चिखल झाला. या एका घटनेत शेतकऱ्याला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. वर्षभर कष्टाने वाढवलेल्या द्राक्षबागेचा हा माल वाळवण्यासाठी औषधे, खते आणि मजुरीवर झालेला ...

**बार्शी : शेंद्री फाट्याजवळ पोलिसांनी दोन तरुणांकडून पिस्तुल, तलवार व तीन कोयते जप्त**

इमेज
**बार्शी : शेंद्री फाट्याजवळ पोलिसांनी दोन तरुणांकडून पिस्तुल, तलवार व तीन कोयते जप्त**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी**बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या खांडवी बीट अंमलदार मदतनीस पोकॉ/१२१९ नागनाथ वैजिनाथ आंधळे यांच्या नेतृत्वाखालील रात्रगस्त पथकाने आज १७ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ०३.१५ वाजता हॉटेल स्वामिनीसमोर (बार्शी-कुडूवाडी रोड, मौजे शेंद्री शिवार) एका बिननंबरच्या मोटरसायकलवरून फिरत असलेल्या दोन तरुणांना अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तुल, एक तलवार व तीन कोयते असा बेकायदेशीर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, १६ एप्रिल रात्री ११ वाजता सुरू झालेल्या कोंबींग ऑपरेशन व रात्रगस्तीदरम्यान शेंद्री फाटा ते बार्शी दरम्यान गस्त घालत असताना संशयास्पद मोटरसायकल दिसली. पथकाने पाठलाग करत हॉटेल स्वामिनीसमोर ती थांबवली. चौकशीत दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांची झडती घेण्यात आली. पंचांसमक्ष झालेल्या झडतीत त्यांच्याकडून खालील वस्तू हस्तगत झाल्या : एक लोखंडी बॉडीचे पिस्तुल (बॅरलवर नक्षी, काळी ग्रीप, मॅगजिनसह, लांबी १७ सेमी, उंची १२ सेमी) किंमत २०,००० रुपये. एक लोखंड...

**बार्शी येथील सॅन्ट्रो ऑर्केस्ट्रा बारमध्ये पोलीस छापा; १८ नर्तिकांसह ९ ग्राहक ताब्यात, १० नकली नोटांचे बंडल, तलवार, दारू आणि १३ वाहने जप्त**

इमेज
**बार्शी येथील सॅन्ट्रो ऑर्केस्ट्रा बारमध्ये पोलीस छापा; १८ नर्तिकांसह ९ ग्राहक ताब्यात, १० नकली नोटांचे बंडल, तलवार, दारू आणि १३ वाहने जप्त**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर ), १७ एप्रिल २०२६:** बार्शी-मालवंडी रोडवरील मौजे बळेवाडी येथील सॅन्ट्रो ऑर्केस्ट्रा बारमध्ये रात्री १२.३० वाजता सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दंगा नियंत्रण पथकाने छापा टाकला. अंगावर तोकडे कपडे घालून १८ महिला अश्लील नृत्य करत असल्याचे आढळून आले. बार मालक, मॅनेजर आणि ९ ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले. ठिकाणावरून १० नकली नोटांचे बंडल, लोखंडी तलवार, देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, १३ वाहने, ४२ हजार रुपयांची रोख रक्कम, साऊंड सिस्टम, अम्प्लिफायर आणि २६ मोबाइल फोन जप्त करण्यात आले. पोलीस अंमलदार रहिम अलादीन मुल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १६ एप्रिल रोजी रात्री मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. दंगा नियंत्रण पथकातील पोकॉ/६७७ सचिन सपाटे, पोकॉ/४५८ बुद्धभूषण खरात, पोको ४७८ आकाश पाचकुडवे, मपोकॉ/१५१९ निशा उइके आणि चालक पोकॉ/डी.६३ पवार यांच्यासह पथक बारमध्ये दाखल झाले. आत ...