**ACB चा मोठा सापळा! चर्नी रोड शिक्षण कार्यालयातील लिपिकाला १.५ लाखांसह रंगेहात पकडले**
**ACB चा मोठा सापळा! चर्नी रोड शिक्षण कार्यालयातील लिपिकाला १.५ लाखांसह रंगेहात पकडले** **KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, २० मे २०२६ :** चर्नी रोड येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक राहुल विठ्ठल शिंदे याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) ने मंगळवारी रंगेहात पकडले. इयत्ता ११वी व १२वी वर्गांसाठी प्रथम मान्यता देण्याची फाईल क्लिअर करण्यासाठी त्याने १.५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदार एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या संस्थेची ११वी-१२वी मान्यतेची फाईल गेल्या काही महिन्यांपासून चर्नी रोड कार्यालयात प्रलंबित होती. शिंदे याने फाईल पुढे सरकवण्यासाठी १.५ लाख रुपयांची मागणी केली. नियमाप्रमाणे काम व्हायला हवे असतानाही लाचेची मागणी करण्यात आल्याने तक्रारदाराने १३ एप्रिल २०२६ रोजी वरळी येथील ACB कार्यालयात तक्रार दाखल केली. ACB पथकाने तक्रारीची गोपनीय पडताळणी केली. पडताळणीत लाच मागणीची पुष्टी झाल्यावर सापळा रचण्यात आला. आज तक्रारदार १.५ लाख रुपये घेऊन कार्यालयात गेला. शिंदे याने रक्कम स्वीकारताच ACB अधिकाऱ्यांनी ...