**सोलापूर : शासकीय वसतिगृहात २०२६-२७ साठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू**
**सोलापूर : शासकीय वसतिगृहात २०२६-२७ साठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू** **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, २६ मे : समाज कल्याण आयुक्तालयाने २५ मे २०२६ च्या परिपत्रकानुसार सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना निवास, भोजन व शिक्षण साहित्य मोफत उपलब्ध करून देणारी ही योजना पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी http://hmas.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी केले आहे. प्रवेशाचे महत्त्वाचे दिनांक - **इयत्ता ८वी:** ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - **३० जून २०२६** - इयत्ता ११वी, १२वी व पदवी अभ्यासक्रम (B.A./B.Com/B.Sc.):** अंतिम तारीख - १५ जुलै २०२६ इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, लॉ व पॉलिटेक्निकसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेनुसार स्वतंत्र वेळापत्रक राहील. जिल्ह्यातील वसतिगृहे जिल्ह्यात एकूण **१६ शासकीय वसतिगृहे** आहेत. ...