पोस्ट्स

**अक्कलकोटमध्ये एसीबीचा मोठा सापळा; पोलीस हवालदारासह तिघे लाच घेताना रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात**

इमेज
**अक्कलकोटमध्ये एसीबीचा मोठा सापळा; पोलीस हवालदारासह तिघे लाच घेताना रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात** **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर :** अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात वापरल्या गेलेल्या स्कॉर्पिओ गाडी आणि मोबाईल परत देण्यासाठी तसेच संबंधितांना जामीन मिळवून देण्यासाठी १.२० लाख रुपयांची लाच स्वीकारताना दोन पोलीस कर्मचारी आणि एक खासगी व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत. ही यशस्वी कारवाई मंगळवारी (१५ जून २०२६) सकाळी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यासमोर करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींमध्ये अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार राजशेखर रामचंद्र कोळी (पोह/५६७), पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत दत्तात्रय देडे (पोकॉ/६१९) आणि खासगी इसम आकाश शरण्णाप्पा काडरामे (वय ३३, रा. अझाद गल्ली, अक्कलकोट) यांचा समावेश आहे. तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात सुरू आहे. **घटनाक्रम काय?**   तक्रारदार यांच्या मित्राने फिरण्यासाठी स्कॉर्पिओ गाडी घेतली होती. ही गाडी गुन्हा नंबर...

**एफडीएची धडाकेबाज कारवाई; मुंबई-कराडमध्ये ३४.६१ लाखांचा अवैध सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त**

इमेज
**एफडीएची धडाकेबाज कारवाई; मुंबई-कराडमध्ये ३४.६१ लाखांचा अवैध सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त**  **KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, १५ जून: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) ने मिसब्रँडेड आणि अवैध सौंदर्यप्रसाधनांविरुद्ध मोहीम सुरू केली असून मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, कांदिवली व सातारा जिल्ह्यातील कराड येथे टाकलेल्या छाप्यांमध्ये एकूण ३४ लाख ६१ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. संबंधित आस्थापनांवर औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम १९४० अंतर्गत कायदेशीर कारवाई सुरू आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. भेसळयुक्त दुध आणि गुटख्याविरोधातील कारवाईनंतर आता सौंदर्यप्रसाधन क्षेत्रात भ्रामक दावे, अपुरी माहिती आणि विनापरवाना उत्पादन-विक्री रोखण्यावर भर देण्यात आला आहे. **कराड येथील मोठी कारवाई:**   १२ जून रोजी गोपनीय माहितीवरून कराडमधील राजलक्ष्मी टेलीकम्युनिकेशन या आस्थापनावर छापा टाकण्यात आला. येथे २९.४५ लाख रुपयांचा सौंदर्यप्रसाधनांचा साठा आढळला. बाह्य पॅकिंग आणि आतील बाटल्यांवरील माहितीत तफावत, बॅच नंबर, उत्पादन तारीख व उत्पादक त...

**​बार्शीत फायनान्सचे बनावट एजंट बनून लुटणारी टोळी गजाआड; दोन आरोपींना पोलीस कोठडी!*

इमेज
​ बार्शीत फायनान्सचे बनावट एजंट बनून लुटणारी टोळी गजाआड; दोन आरोपींना पोलीस कोठडी!  **KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी)**: फायनान्स कंपनीचे वसुली एजंट असल्याचे भासवून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना अडवून लूट करण्याच्या टोळीला बार्शी तालुका पोलिसांनी केली अटक. या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. रविवारी (१४ जून २०२६) दुपारी सतीश विजयराव हावळे (रा. दहिफळ, ता. कळंब, जि. धाराशिव) आपल्या मुलाच्या नावे असलेली हिरो पॅशन मोटारसायकल (एच २५ बी सी ३८८३) घेऊन बार्शीकडे येत होते. कुसळंब टोलनाक्याच्या पुढे एम.पी. पेट्रोल पंपाजवळ दोन आरोपींनी मोटारसायकलवरून पाठलाग करत त्यांना अडवले.  ‘तुमच्या गाडीवर फायनान्सचे कर्ज आहे, आम्ही ती जप्त करणार आहोत,’ अशी बतावणी करत आरोपींनी गाडीची चावी हिसकावली. गाडीवर कर्ज नसल्याचे सांगूनही त्यांनी १२ हजार रुपयांची मागणी केली. भीतीपोटी फिर्यादीने १० हजार रुपये (फोन-पे व रोख) दिले. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी चावी परत करताना फिर्यादीच्या बोटातील एक तोळ्याची सोन्याची अंगठी (किंमत सुमारे १ लाख रुपये) जबरदस्तीने काढून घेतली. तसेच मारहाण व शिवीग...

**बार्शी जिल्हा न्यायालयाने १४ वर्षांनंतर दिलासा: माढा कोर्टातील शिक्षेला दिलासा, आरोपी भैरू डांगे निर्दोष मुक्त**

इमेज
**बार्शी जिल्हा न्यायालयाने १४ वर्षांनंतर दिलासा: माढा कोर्टातील शिक्षेला दिलासा, आरोपी भैरू डांगे निर्दोष मुक्त**  **KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी):** सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळवटे येथे २०१३ मध्ये घडलेल्या मारहाण प्रकरणात माढा न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला आव्हान देणाऱ्या अपिलावर बार्शी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी भैरू डांगे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालामुळे आरोपीला १४ वर्षांनंतर न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. २०१३ रोजी उपळवटे (ता. माढा) येथे सख्ख्या चुलत भावाच्या शेतात जनावरं गेल्याच्या कारणावरून वाद झाला होता. यात आरोपी भैरू डांगे यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप होता. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद (क्र. १७३/२०१३) झाला होता. माढा येथील जे.एम.एस.सी. कोर्टाने २०१९ मध्ये आरोपींना दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात आरोपी भैरू डांगे यांनी ॲड. गणेश हांडे यांच्या मार्फत बार्शी जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. अपिलात ॲड. हांडे यांनी पुराव्यांच्या कमतरतेचे अनेक मुद्दे उपस्थित केले. यात मुख्य मुद...

**माळशिरस: भाविकांची पिकअप विहिरीत कोसळली; ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ६ जखमी**

इमेज
**माळशिरस: भाविकांची पिकअप विहिरीत कोसळली; ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ६ जखमी**  **KDM NEWS प्रतिनिधी माळशिरस सोलापूर:** सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावाजवळ रविवारी दुपारी भीषण अपघात झाला. म्हसवड येथील श्री सिद्धनाथाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावच्या भाविकांची पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल विहिरीत कोसळली. या दुर्घनेत ८ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ६ जणांना वाचवण्यात यश आले. मृतांमध्ये ४ महिलांसह ४ लहान मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रांजणी गावातील १४-१५ भाविक दर्शनासाठी म्हसवडला गेले होते. दर्शन आटोपून ते पिकअप वाहनाने गावाकडे परतत होते. म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव पिकअप थेट रस्त्याशेजारच्या विहिरीत कोसळली. विहिरीत पाणी असल्याने प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. अपघाताचा आवाज ऐकताच तांदूळवाडी गावातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने आणि अग्निशामक दल, क्रेन व बचाव पथकांच्या साहाय्याने वाहन आणि मृतदेह बाहेर...

**सोलापूर : विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदारांना EPIC किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे ओळखपत्र अनिवार्य**

इमेज
**सोलापूर : विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदारांना EPIC किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे ओळखपत्र अनिवार्य**  **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, १३ जून २०२६ :** जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने महाराष्ट्र विधानपरिषद सोलापूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. १८ जून २०२६ रोजी जिल्ह्यातील ६ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, मतदारांनी ओळख पटविण्यासाठी EPIC (मतदार ओळखपत्र) किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकृत ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या १८ मे २०२६ च्या पत्रानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, मतदानाच्या दिवशी मतदाराकडे वरील दोनपैकी एकही ओळखपत्र नसल्यास मतदानाला परवानगी मिळणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील सर्व सदस्यांकडे ओळखपत्र असल्याची खात्री संबंधित संस्थांनी करावी. ज्या सदस्यांकडे EPIC किंवा ओळखपत्र नाही, त्...

**सोलापूर : राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी खासगी सोनोग्राफी केंद्रांची अचानक पाहणी**

इमेज
**सोलापूर : राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी खासगी सोनोग्राफी केंद्रांची अचानक पाहणी**  **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर**, दि. १३ जून : पीसीपीएनडीटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यातील नोंदणीकृत खाजगी सोनोग्राफी केंद्रांना अचानक भेटी दिल्या. यामध्ये रुग्णनोंदी, ऑनलाइन एफ-फॉर्म, कायद्याचे पालन, आवश्यक कागदपत्रे आणि केंद्रातील इतर सुविधांची सविस्तर तपासणी करण्यात आली. आरोग्य भवन, मुंबई येथे २७ मे २०२६ रोजी राज्य पर्यवेक्षीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत माननीय आरोग्य मंत्र्यांच्या सूचनेनुसार ही तपासणी मोहीम राबवण्यात आली. लिंग निवड प्रतिबंधित करणे आणि गर्भलिंग निदान रोखणे हा या भेटींचा मुख्य उद्देश होता. **डॉ. दिगंबर कानगुले**, उपसंचालक (वि. ल. टो.), राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे यांनी सांगितले की, “पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अशा अचानक भेटी आणि तपासण्या नियमितपणे घेण्यात येत आहेत.” जिल्हा शल्यचिकित्सक **डॉ. वर्षा डोईफोडे** यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले की, कोणतेही सोनोग्राफी केंद्र कायद्याचे उल्लंघ...