**आषाढी वारी नियोजनात प्रोटोकॉल भंग? पालकमंत्र्यांच्या पंढरपूर दौऱ्यात जि.प. अध्यक्ष दीपक वैद्य यांना निमंत्रण नाही**
**आषाढी वारी नियोजनात प्रोटोकॉल भंग? पालकमंत्र्यांच्या पंढरपूर दौऱ्यात जि.प. अध्यक्ष दीपक वैद्य यांना निमंत्रण नाही** **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर:** आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा, पालखी मार्ग, विसावा स्थळे, मुक्काम व्यवस्था आणि विकासकामांच्या तयारीची पाहणी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी २८ जून २०२६ रोजी पंढरपूर व वाखरी परिसराचा दौरा केला. या दौऱ्यात जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, इतर पदाधिकारी आणि विभागीय अधिकारी उपस्थित होते. मात्र, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांना अधिकृत निमंत्रण किंवा निरोप न दिल्याने प्रोटोकॉलचे पालन न झाल्याचे प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा व अन्य महत्त्वाच्या सुविधा पुरवण्यात येत असताना संस्थेच्या सर्वोच्च लोकप्रतिनिधीला डावलणे प्रशासनाच्या समन्वयावर प्रश्नचिन्ह उभे करत आहे. **अध्यक्ष वैद्य यांची प्रतिक्रिया:** या प्रकरणाबाबत दीपक वैद्य यांनी स्पष्ट ...