पोस्ट्स

*‘हे पालकमंत्री नव्हे, बालकमंत्री’; सुषमा अंधारेंचा जयकुमार गोरे आणि भाजपवर घणाघात**

इमेज
**‘हे पालकमंत्री नव्हे, बालकमंत्री’; सुषमा अंधारेंचा जयकुमार गोरे आणि भाजपवर घणाघात**  **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, ९ ऑगस्ट** – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज येथे पत्रकार परिषद घेऊन सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर १९ हून अधिक गुन्हे दाखल असल्याचा आरोप केला. “काय किर्ती राव, मिस्टर गोरे?” असा सवाल करत त्यांनी फसवणूक, महिला संबंधित प्रकरणे आणि कोरोना काळातील बोगस बिलांच्या आरोपांवरून जोरदार टीका केली. गंभीर प्रकरणांची सखोल चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. अंधारे म्हणाल्या, कोरोना काळात मयत रुग्णांना जिवंत दाखवून सुमारे २०० हून अधिक बोगस बिले तयार करून पैसे लाटण्यात आले. खोटा मेडिकल ऑफिसर दाखवून त्याच्या सहीनिशी हजारो बिले काढली गेली. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी संगनमताने एफआयआर आणि चार्जशीटमधून गोरे यांचे नाव काढून टाकले. उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने समन्स बजावले असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपमध्ये इतके खटले आणि गुन्हे असलेला हा पहिला मंत्री असू शकतो, असेही त्या म्हणाल्...

**सोलापूर : पावसाची प्रतीक्षा कायम, तापमान वाढीचा अंदाज; शेतकऱ्यांची चिंता वाढली**

इमेज
**सोलापूर : पावसाची प्रतीक्षा कायम, तापमान वाढीचा अंदाज; शेतकऱ्यांची चिंता वाढली**  **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, ९ ऑगस्ट २०२६**   जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम असताना उन्हाचा तडाखा पुन्हा वाढू लागला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज (रविवार) आणि येत्या काही दिवसांत कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान साधारण २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. ढगाळ वातावरण आणि कडक ऊन यामुळे आर्द्रता वाढून उकाडा जाणवत आहे. हवामान अंदाजानुसार आज अंशतः ढगाळ आकाश राहून विखुरलेल्या वादळी पावसाची किंवा विजेची शक्यता २५ टक्क्यांपर्यंत आहे. सोमवार आणि मंगळवारी पावसाची शक्यता काही प्रमाणात वाढू शकते (३५ ते ६० टक्के). मात्र दमदार आणि सलग पावसाचा अंदाज सध्या तरी दिसत नाही. आर्द्रता ५८ ते ७८ टक्क्यांपर्यंत राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे उकाडा जास्त जाणवेल. **शेतकऱ्यांची चिंता**   खरीप हंगामातील पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. पावसाअभावी जमिनीतील ओलावा झपाट्याने आटत असून तापमानवाढीमुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे...

**बार्शी तालुका पोलिसांचा अभिनव उपक्रम: ‘बेस्ट पोलीस ऑफ द मंथ’ आणि ‘बेस्ट पोलीस पाटील ऑफ द मंथ’ सुरू**

इमेज
**बार्शी तालुका पोलिसांचा अभिनव उपक्रम: ‘बेस्ट पोलीस ऑफ द मंथ’ आणि ‘बेस्ट पोलीस पाटील ऑफ द मंथ’ सुरू**  KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर : बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्यात प्रथमच ‘बेस्ट पोलीस ऑफ द मंथ’ आणि ‘बेस्ट पोलीस पाटील ऑफ द मंथ’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. **उद्देश**   पोलीस अधिकारी, अंमलदार आणि पोलीस पाटील यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान करून त्यांना अधिक उत्साहाने काम करण्यासाठी प्रोत्साहन देणे. गुन्हे उघडकीस आणणे, प्रतिबंधात्मक कारवाया, कायदा व सुव्यवस्था राखणे, जनतेशी संवाद, तक्रारींचे जलद निराकरण आणि समाजहिताची कामगिरी हे निकष असतील. **जुलै २०२६ साठी निवड**   - **बेस्ट पोलीस ऑफ द मंथ** : पोलीस हवालदार अरुण अंबादास डुकळे. गुन्ह्यांची निर्गती, दारूबंदी कारवाई, प्रतिबंधात्मक कारवाया आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यातील उल्लेखनीय कामगिरीसाठी निवड.   - **बेस्ट पोलीस पाटील ऑफ द मंथ** : पाथरीचे पोलीस पाटील शंकर उत्तम गायकवाड. गावातील सामंजस्य राखणे, समन्स-वॉरंट बजावणे, ज्येष्ठ ना...

**बार्शी_उपसा_सिंचन योजना: कोरफळे शिवारातील पंप हाऊसपर्यंत पोहोचले #उजनीचे पाणी; २५०० एकर शेतजमीन ओलिताखाली!**

इमेज
**बार्शी_उपसा_सिंचन योजना: कोरफळे शिवारातील पंप हाऊसपर्यंत पोहोचले #उजनीचे पाणी; २५०० एकर शेतजमीन ओलिताखाली!**  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी :** बार्शी उपसा सिंचन योजना टप्पा-१ अंतर्गत उजनी धरणाचे पाणी आज कोरफळे शिवारातील पंप हाऊसपर्यंत यशस्वीरित्या पोहोचले. यामुळे गावातील सुमारे २५०० एकर शेतजमीन ओलीताखाली येणार आहे. कोरफळे पंप हाऊस परिसरात ग्रामस्थांच्या वतीने भव्य पाणीपूजन सोहळा आयोजित करण्यात आला. आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत यांच्या हस्ते पाणीपूजन झाले. या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली मान्यता आणि निधी, तसेच आमदार राऊत यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा व जलसंपदा विभागाशी केलेला समन्वय यामुळे टप्पा पूर्णत्वास आला आहे. पाणीपूजनानंतर आमदार राऊत म्हणाले, “आज कोरफळे आणि बार्शी तालुक्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे. उजनीचे पाणी पंप हाऊसपर्यंत आले आहे. यामुळे २५०० एकर शेतीला संजीवनी मिळाली. हा श्रेय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दूरदृष्टीला जातो. बार्शी तालुक्याला ‘पाणीदार बार्शी’ करण्याचा आमचा संकल्प आहे. पुढील टप्प्यातही अशीच कामे मार्गी लावू.” गावातील शेतकऱ्यांनी आनंद...

**शिंदेंची_दिल्ली_वारी : खासदारांसह थेट मोदींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण**

इमेज
**शिंदेंची_दिल्ली_वारी : खासदारांसह थेट मोदींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण**  KDM_NEWS प्रतिनिधी नवी दिल्ली, ७ ऑगस्ट : शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीला शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच श्रीरंग बारणे, रवींद्र वायकर, नरेश म्हस्के, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांसह पक्षीय खासदार उपस्थित होते. भेटीत उद्धव ठाकरे गटातून नुकतेच शिंदे गटात आलेल्या सहा खासदारांसोबत विशेष संवाद झाला. पंतप्रधान मोदींनी ब्रेकफास्ट बैठकीत या खासदारांना थेट आश्वासन दिले, “काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे.” त्यांनी सांगितले की, एनडीए एक परिवार आहे. प्रत्येक खासदाराला सन्मान दिला जाईल आणि संधी मिळेल. मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी थेट पंतप्रधान कार्यालयाशी (PMO) संपर्क साधा, असा स्पष्ट निर्देशही देण्यात आला. मोदींनी प्रत्येक खासदाराशी वैयक्तिक विचारपूस केली. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या योगाभ्यासाबाबत विशेष चौकशी करत आरोग्याची...

**शेलगाव मा येथे शेतकऱ्यांचा रस्ता रोको; थकीत पीक विमा व कर्जवसुली नोटिसांविरोधात आंदोलन**

इमेज
**शेलगाव मा येथे शेतकऱ्यांचा रस्ता रोको; थकीत पीक विमा व कर्जवसुली नोटिसांविरोधात आंदोलन** #KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. ६ ऑगस्ट : पंतप्रधान पीक विमा योजना २०२५ अंतर्गत थकीत विमा रक्कम तत्काळ मिळावी आणि राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यानंतरही बँकांकडून पाठवल्या जाणाऱ्या सक्तीच्या वसुली नोटिसा थांबवाव्यात, या मागण्यांसाठी बार्शी तालुक्यातील शेलगाव मा येथे आज शेतकऱ्यांनी तीव्र रस्ता रोको आंदोलन केले. #आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा लागून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. शेतकऱ्यांनी मंडळ अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी शासन व प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विकास बारबोले यांनी सांगितले की, कर्जमाफी जाहीर झाल्यानंतरही बँका शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून मानसिक त्रास देत आहेत. तसेच २०२५ चा हक्काचा पीक विमा देण्यास टाळाटाळ केली जात आहे. हा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मुसा मुलाणी, हनुमंत भोसले व युवासेनेचे जिल्हा प्रमुख पांडुरंग घोलप यांनी मनोगत व्यक्त करताना पुढील काळात तीव्र आंदोलन ...

**बार्शीत निवृत्त बँक कर्मचाऱ्याची तब्बल २ कोटी १४ लाखांची ऑनलाइन फसवणूक; शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाला बळी**

इमेज
**बार्शीत निवृत्त बँक कर्मचाऱ्याची तब्बल २ कोटी १४ लाखांची ऑनलाइन फसवणूक; शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाला बळी**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर ) – फेसबुकवरील शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आकर्षक जाहिरातीला भुलून बार्शीतील एका ६३ वर्षीय निवृत्त बँक कर्मचाऱ्याची तब्बल २ कोटी १४ लाख ९५ हजार ५७६ रुपये २० पैशांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५९७/२०२६ नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी मोहन जगन्नाथ गायकवाड (वय ६३, रा. १२८३ कसबा पेठ, एकविराई मंदिराजवळ, बार्शी) हे निवृत्त पेन्शनर आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जानेवारी २०२६ मध्ये फेसबुक पाहत असताना त्यांना “२७ Acume” या नावाची शेअर मार्केटसंदर्भातील जाहिरात दिसली. त्यावर क्लिक केल्यानंतर त्यांना “२७ Acume Stock Capital” या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. त्यानंतर स्वतःला कंपनीचे प्रतिनिधी सांगणाऱ्या व्यक्तींनी संपर्क साधून दररोज ५ ते २५ टक्के परतावा मिळण्याचे आमिष दाखवत “Acume Pro App” डाउनलोड करण्यास सांगितले. केवायसी प्रक्रिया पूर्ण करून त्यांचे ट्रेडिंग ...