**बार्शीत शस्त्रबंदीचे उल्लंघन; गावठी पिस्तूल आणि तलवारीसह तीन जण पोलिसांच्या ताब्यात**
**बार्शीत शस्त्रबंदीचे उल्लंघन; गावठी पिस्तूल आणि तलवारीसह तीन जण पोलिसांच्या ताब्यात** KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, १२ ऑगस्ट बार्शी शहर पोलीस ठाणे परिसरात रात्रीच्या वेळी शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुभाष नगर येथील हिरेमठ हॉस्पिटल परिसरात मध्यरात्री सुमारे दोन वाजता कारवाई झाली. आरोपी सचिन कुमार मिरगणे (वय ३८, रा. सुभाष नगर, बार्शी), दत्ता उंदरे आणि राहुल अनभूले (दोघे रा. बार्शी) यांच्याकडून विनापरवाना शस्त्रे जप्त करण्यात आली. जप्त साहित्यात गावठी बनावटी पिस्तूल (किंमत सुमारे ५० हजार रुपये), लोखंडी तलवार (सुमारे ४ हजार रुपये), धारदार चाकू (सुमारे १ हजार रुपये) आणि गजगा रंगाची स्विफ्ट डिझायर कार (सुमारे ५ लाख रुपये) यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सोलापूर यांच्या ३ ऑगस्ट २०२६ च्या आदेशानुसार (जा.क्र. २०२६ डीसीबी २/आर.आर. ३६०९) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) (३) अंतर्गत ५ ते १९ ऑगस्ट दरम्यान शस्त्रबाजीवर बंदी लागू होती. या आदेशाचे उल्लंघन करून सचिन मिरगणे यांनी कारमध्ये गावठी पिस्तू...