*बार्शीत लंबोदर प्रतिष्ठानचा महिला आरती व खेळसोहळा उत्साहात; सुप्रिया पवार ठरल्या 'सोन्याची नथ'च्या मानकरी
*बार्शीत लंबोदर प्रतिष्ठानचा महिला आरती व खेळसोहळा उत्साहात; सुप्रिया पवार ठरल्या 'सोन्याची नथ'च्या मानकरी* *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : शिवछत्रपती व्यायाम शाळा, पाटील चाळ तरुण गणेश मंडळ संचलित लंबोदर प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवानिमित्त आयोजित महिला आरती व मनोरंजक खेळ सोहळा तुळजापूर रोड, पाटील चाळ येथील हनुमान मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात महिलांच्या उपस्थितीत भावपूर्ण महाआरतीने झाली. त्यानंतर महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत खेळांचा आनंद लुटला. लहान मुला-मुलींनी सादर केलेल्या नृत्यांनी कार्यक्रमाला रंगत आणली. उपस्थितांनी बालकलागुणांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संज्योती योगेश थोरात यांनी खुसखुशीत आणि ओघवत्या शैलीत केले. त्यामुळे वातावरण उत्साहात राहिले. मनोरंजक खेळ स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. प्रथम क्रमांक सुप्रिया संघर्ष पवार यांनी पटकावला. त्यांना सोन्याची नथ प्रदान करण्यात आली. द्वितीय क्रमांक नीता महेश स...