*न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संपास आमदार दिलीप सोपल यांचा पाठिंबा; मागण्या अधिवेशनात मांडण्याची ग्वाही*
*न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संपास आमदार दिलीप सोपल यांचा पाठिंबा; मागण्या अधिवेशनात मांडण्याची ग्वाही* KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू असताना बार्शीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दिला. शासनाने या मागण्यांबाबत गांभीर्याने विचार करून हिवाळी अधिवेशनापर्यंत निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी अधिवेशनापर्यंत मागण्या मान्य न झाल्यास विधानसभेत प्रश्न मांडण्याची ग्वाही दिली. राज्यातील सुमारे ३४ हजार दुय्यम न्यायालयीन कर्मचारी (गट क, लघुलेखक, बेलिफ आणि गट ड) १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२५ रोजी ‘समान काम, समान वेतन’ तत्त्वावर सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता. हा प्रस्ताव गेल्या २२ महिन्यांपासून प्रलंबित असल्याने कर्मचारी संघटनांनी टप्प्याटप्प्याने काळ्या फिती, सामूहिक रजा आणि आता बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. यामुळे राज्यभरातील जिल्हा व तालुका न्यायालयांचे कामकाज ठप्प झाले...