**घरकुल हप्त्यासाठी १२ हजारांची लाच; उंबरगावचे ग्रामसेवक प्रशांत मुकरे व शिपाई दत्तात्रय कांबळे रंगेहात पकडले**
**घरकुल हप्त्यासाठी १२ हजारांची लाच; उंबरगावचे ग्रामसेवक प्रशांत मुकरे व शिपाई दत्तात्रय कांबळे रंगेहात पकडले** **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, १७ मार्च २०२६** : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (PMAY) मंजूर झालेल्या घरकुलाच्या शेवटच्या हप्त्यासाठी लाभार्थीकडून लाच मागितल्याप्रकरणी उंबरगाव (ता. पंढरपूर) येथील ग्रामपंचायत अधिकारी तथा ग्रामसेवक प्रशांत प्रकाश मुकरे (वय ४५/४७, रा. जुना कराड नाका, पंढरपूर) व ग्रामपंचायत शिपाई दत्तात्रय अभिमान कांबळे (वय ४५, रा. उंबरगाव) यांना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) १६ मार्च रोजी रंगेहात पकडले. एका बेघर लाभार्थीला PMAY अंतर्गत घरकूल मंजूर झाले होते. घर बांधकाम अंतिम टप्प्यात असताना उर्वरित हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थीने ग्रामसेवकाकडे संपर्क साधला. ग्रामसेवकाने शिपायामार्फत २० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. १३ मार्च रोजी ग्रामसेवक गावात नसल्याने रक्कम देता आली नाही. १६ मार्च रोजी शिपाई दत्तात्रय कांबळे याने ग्रामसेवकासाठी १२ हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. त्याचवेळी एसीबी पथकाने सापळा रचून शिपा...