**बार्शीच्या कव्हे गावात अवैध मुरूम उत्खननाचा धडाका; चर्मकार समाजाच्या पूर्वजांच्या समाधीची तोडफोड**
**बार्शीच्या कव्हे गावात अवैध मुरूम उत्खननाचा धडाका; चर्मकार समाजाच्या पूर्वजांच्या समाधीची तोडफोड** **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी** जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कव्हे गावातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. गावठाण क्षेत्रातील स्मशानभूमीजवळ दिवसाढवळ्या अवैध मुरूम उपसा सुरू आहे , यात चर्मकार समाजाच्या पूर्वजांच्या स्मृती असलेल्या समाधीची तोडफोड करण्यात आल्याने गावात तणावाचे वातावरण. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असतानाही महसूल प्रशासन आणि ग्रामपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. समाधीची तोडफोड: धार्मिक भावनांशी खेळ कव्हे येथील गावठाण जागेत अनेक वर्षांपासून **चर्मकार समाजाच्या पूर्वजांच्या समाधी** आहेत. मात्र, मुरूम माफियांच्या हापापलेपणाने या समाधींची तोडफोड करून त्या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने खोल उत्खनन केले आहे. आपल्या पूर्वजांच्या खुणा पुसल्या जात असल्याचे पाहून समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्मशानभूमीसारख्या पवित्र जागेचे विद्रुपीकरण होत असल्याने स्थानिकांच्या धार्मिक भावनांना मोठा तडा गेला आहे. महसूल प्रशासन ...