**सोलापूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन; कुलदीप जंगम यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी बदली**
**सोलापूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन; कुलदीप जंगम यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी बदली** **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर - महाराष्ट्र शासनाने बुधवारी सायंकाळी पाच वाजता पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या. यात सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम (आयएएस २०२०) यांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी गडचिरोली येथील सहाय्यक जिल्हाधिकारी व आयटीडीपी अहेरीचे प्रकल्प अधिकारी कुशल जैन (आयएएस २०२२) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून, राज्यातील प्रशासकीय फेरबदलांच्या मालिकेत हा तिसरा मोठा बदल आहे. कुलदीप जंगम यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत सुमारे दीड वर्षाच्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी केली. अनुकंपा भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकपणे राबवून त्यांनी जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढवला. शासनाच्या ‘१५० दिवस सेवाकर्मी’ कार्यक्रमात सोलापूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम क्रमांकावर राहिली. या यशस्वी कामगिर...